Bizarre Cricket Rule : ‘या’ स्पर्धेत षटकार ठोकण्यालाच आहे बंदी

Bizarre Cricket Rule : इंग्लंडमधील हा क्लब आहे जिथे स्पर्धांमध्ये षटकार ठोकला तर फलंदाज चक्क बाद देण्यात येतो.

142
Bizarre Cricket Rule : ‘या’ स्पर्धेत षटकार ठोकण्यालाच आहे बंदी
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडमध्ये साऊथविक अँड शोअरहॅम क्लब नावाचा एक जुना ऐतिहासिक क्रिकेट क्लब आहे. या क्लबने स्थानिक पातळीवर एक विचित्र नियम लागू केला आहे. फलंदाजाने षटकार मारण्यावर इथं बंदी आहे. षटकार मारलाच तर फलंदाज चक्क बाद दिला जातो. भारतातील गल्ली क्रिकेटशी मिळता जुळता असा हा नियम तुम्हाला वाटतो ना? या नियमामागचं कारणही तसंच आहे. भारतात जसं चेंडू टोलवायला जागाच नसते आणि चेंडू आसपासच्या घरांमध्ये जाऊन पडतो, काहीवेळा घरांच्या काचाही फोडतो, तसंच काहीसं चित्र इथेही आहे. शेवटी क्लब आयोजकांना हा विचित्र नियम बनवावा लागला. (Bizarre Cricket Rule)

पण, यात विशेष म्हणजे साऊथविक अँड शोअरहॅम क्लब हा २३४ वर्षं जुना आहे आणि आजतागायत तिथे हा नियम लागू होतो. ससेक्सच्या पश्चिम भागांत हा क्लब आहे. त्यांच्याकडे आजूबाजूच्या लोकांकडून सतत तक्रारी येत होत्या. घरांचं नुकसान होत होतं. ही समस्या सोडवण्यासाठी क्लबने हा जगावेगळा नियम बनवला, जो इथं अधिकृतपणे राबवला जातो. ‘पहिला षटकार हा गृहित धरला जात नाही. म्हणजे सहा धावा संघाला मिळतच नाहीत. एकाच फलंदाजाने दुसऱ्यांदा षटकार ठोकला तर तो चक्क बाद दिला जातो.’ (Bizarre Cricket Rule)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये अगदी दुसऱ्या फेरीतही आमनेसामने येऊ शकतात नदाल आणि जोकोविच)

टेलिग्राफने पहिल्यांदा ही बातमी केली तेव्हाच क्रिकेटमधील या जगावेगळ्या नियमाची चर्चा झाली होती. ‘हे खूपच लहान मैदान आहे. आणि ऊर्जेनं भरलेल्या तरुण मुलांना चेंडू उंच फटकावू नका हे तुम्ही कसं सांगणार? मग शेवटी हा पर्याय समोर आला. कारण, त्याशिवाय षटकार मारायचाच नाही, ही गोष्ट मुलांना १०० षटकांच्या सामन्यात सांगणं शक्य नव्हतं,’ असं ८० वर्षांच्या स्थानिक रहिवासी मेरी गिल म्हणाल्या. खेळाडूंना अर्थातच हा नियम रुचलेला नाही. क्रिकेटसारखा खेळ जगभरात अधिकाधिक वेगवान होत असताना इथं षटकारच मारायचा नाही, ही गोष्ट त्यांना हास्यास्पद वाटतेय. (Bizarre Cricket Rule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.