रोहित आणि गंभीरमध्ये कसलाही वाद नाही, BCCI उपाध्यक्षांनी केलं स्पष्ट

सिडनी कसोटीपूर्वी दोघांमध्ये बोलाचाली बंद असल्याची बातमी पसरली होती.

25
रोहित आणि गंभीरमध्ये कसलाही वाद नाही, BCCI उपाध्यक्षांनी केलं स्पष्ट
रोहित आणि गंभीरमध्ये कसलाही वाद नाही, BCCI उपाध्यक्षांनी केलं स्पष्ट
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बोर्डर – गावसकर मालिका १-३ ने गमावली. आणि त्याचे पडसाद आता बीसीसीआयमध्ये (BCCI) उमटत आहेत. रविवारी बीसीसीआयने (BCCI) संघ प्रशासन आणि कार्यकारिणी सदस्य यांच्यामध्ये पराभवाची मीमांसा करणारी एक बैठकही घेतली. त्यानंतर खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गासाठी आचारसंहिताही आणली जाणार आहे. पण, या मालिकेत एक महत्त्वाचा मुद्दा गाजला होता तो संघात पडलेल्या दोन तटांचा. रोहित आणि गंभीरमधील बेबनावाचा. खासकरून सिडनी कसोटीत अगदी आदल्या दिवशी रोहित शर्माला (Rohit Sharma) वगळल्यावर रोहित आणि गंभीर यांच्यातून विस्तवही जात नसल्याची चर्चा ऑस्ट्रेलियातच सुरू झाली होती. सरावादरम्यान दोघं एकाच नेट्समध्ये असताना रोहितने गंभीरशी बोलणंही टाळलं होतं.

बीसीसीआयकडून (BCCI) यावर अजूनपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. पण, आता बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी पत्रकारांशी बोलताना थेट उत्तर दिलं आहे. ‘ही बातमी खोटी आहे. रोहित आणि गंभीर यांचं बरं चाललंय,’ असं शुक्ला यांनी सुनावलंय. त्याचबरोबर निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातही मतभेद नसल्याचं शुक्ला म्हणाले.

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : बांगलादेशातून हेरगिरीसाठी भारतात तृतीयपंथीयांची घुसखोरी)

(हेही वाचा – State BJP अध्यक्ष निवडला आता रस्सीखेच Mumbai BJP अध्यक्ष पदासाठी!)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट पूर्णपणे शांत होती. त्यामुळे सततच्या अपयशानंतर त्याने सिडनी कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्याला वगळण्याचा निर्णय गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) होता, अशा आशयाच्या बातम्या मीडियामधून बाहेर आल्या. याबद्दल बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, “रोहितने (Rohit Sharma) कर्णधारपदाचा आग्रह धरला आहे हे देखील चुकीचे आहे, तो कर्णधार आहे. फॉर्ममध्ये असणं किंवा नसणं हा क्रिकेटचा एक भाग आहे. जेव्हा त्याला कळले की तो फॉर्ममध्ये नाही, तेव्हा त्याने पाचव्या कसोटीतून स्वतःला बाहेर ठेवले.

चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड १८ किंवा १९ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीनंतर केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय संघ आता २२ तारखेपासून इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.