Champions Trophy, Ind vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंडचे संघ यापूर्वी जेव्हा चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत आमने सामने आले…

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आयसीसी स्पर्धेत २५ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम लढत होत आहे.

59
Champions Trophy Final : भारतीय संघाचा दुबईत जोरदार सराव, दुबईची खेळपट्टी कशी असेल?
Champions Trophy Final : भारतीय संघाचा दुबईत जोरदार सराव, दुबईची खेळपट्टी कशी असेल?
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy) अंतिम सामना रविवारी ९ तारखेला दुबई इंटरनॅशनल मैदानावर (Dubai International Stadium) होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ त्यासाठी आमने सामने येतील. विशेष म्हणजे मागच्या २५ वर्षांत हे दोन संघ पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत समोरासमोर येत आहेत. रविवारी न्यूझीलंडला साखळीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी असेल. तर भारताला २०२१ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाचं उट्ट काढण्याची संधी असेल.

पण, त्यापूर्वी तब्बल २५ वर्षांपूर्वी हे दोन संघ चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) अंतिम फेरीतच आमने सामने आले होते. आणि त्या सामन्यांत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. तेव्हा या स्पर्धेचं नाव आयसीसी नॉकआऊट असं होतं. आणि २००० मध्ये ही स्पर्धा नैरोबी इथं झाली होती. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने तेव्हा पहिली फलंदाजी करत ६ बाद २६४ धावा केल्या होत्या. गांगुलीने सर्वाधिक ११७ तर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर मधळी फळी मात्र कोसळली. आणि भारताला पावणे तीनशे धावा करता आल्या नाहीत. खेळपट्टी फलंदाजांना धार्जिणी होती. आणि अशा खेळपट्टीवर स्टिफन फ्लेमिंगच्या किवी संघाने हे आव्हान लिलया पार केलं. (Champions Trophy, Ind vs NZ Final)

(हेही वाचा – Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास)

ख्रिस केर्न्सने (Chris Cairns) तेव्हा ११३ चेंडूंत १०२ धावा केल्या होत्या. जवागल श्रीनाथ, झहीर खान या गोलंदाजांचा त्याने समर्थपणे मुकाबला केला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघ आजतागायत टी-२० किंवा एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावू शकलेला नाही. २०१५ आणि २०१९ मध्ये संघाने अंतिम फेरीत मजल मारली. पण, तिथे त्यांची गाडी अडली. (Champions Trophy, Ind vs NZ Final)

या दोन संघांदरम्यान झालेला साखळी सामना भारतीय संघाने जिंकला होता. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) ७९ धावांच्या जोरावर भारताने २४९ धावा केल्या. आणि वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) भेदक गोलंदाजी करताना ५ किवी फलंदाज बाद केले होते. किवी संघ प्रत्युत्तरादाखल २०५ धावा करू शकला. पण, त्यानंतर उपान्त्य सामन्यांत मात्र न्यूझीलंड संघाने ३६२ धावाही केल्या. आफ्रिकन संघाचा ५० धावांनी निर्विवाद पराभवही केला. (Champions Trophy, Ind vs NZ Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.