Tilak Verma : तिलक वर्माच्या नाबाद ३१४ धावा, टी-२० मध्ये नाबाद राहण्याचा विक्रम

Tilak Verma : तिलक वर्मा मागचे ५ डाव नाबाद आहे

122
Tilak Verma : तिलक वर्माच्या नाबाद ३१४ धावा, टी-२० मध्ये नाबाद राहण्याचा विक्रम
Tilak Verma : तिलक वर्माच्या नाबाद ३१४ धावा, टी-२० मध्ये नाबाद राहण्याचा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या तिलक वर्माने नाबाद ७२ धावा करत भारताला हा सामना एकहाती जिंकून दिला. त्यामुळेच भारत मालिकेत २-० अशी घसघशीत आघाडी घेऊ शकला. तिलक वर्माच्या कामगिरीचं मोल त्याहून जास्त आहे. कारण, मागचे काही टी-२० सामने तो भारतासाठी अजोड कामगिरी करत आला आहे. आणि विशेष म्हणजे शेवटचे ५ डाव तो नाबाद आहे. चेन्नईच्या सामन्यात सर्वाधिक डाव नाबाद राहण्याचा विक्रमही त्याच्या नावावर लागला आहे. आयसीसीच्या पूर्ण सदस्यांमध्ये नाबाद राहून ३०० च्या वर धावा करणारा तो एकटाच आहे. शेवटच्या ५ डावांमध्ये त्याची दोन शतकंही आहेत. (Tilak Verma)

(हेही वाचा- Maharashtra Politic : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होणार)

इंग्लंड विरुद्ध भारताला विजयासाठी १६६ धावा हव्या असताना संघाची अवस्था एकेक्षणी ७८ धावांमध्ये ५ बाद अशी झाली होती. त्यानंतरही हार्दिक पांड्या बाद झाला. पण, तिलकने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून एका बाजूने आक्रमण सुरूच ठेवलं. ५५ चेंडूंत ७२ धावा करत शेवटच्या षटकांत त्याने भारताला विजय मिळवून दिला. ८ बाद १४६ धावा झाल्या असताना त्याने फटकेबाजी सुरूच ठेवत विजयासाठी प्रयत्न केले.  (Tilak Verma)

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना तिलक वर्मा २० धावा करून गेबेखामध्ये बाद झाला होता. तेव्हापासून तो नाबाद आहे. आणि यात त्याने नाबाद १०७, नाबाद १२०, नाबाद १९ आणि आता नाबाद ७२ धावा केल्या आहेत. त्याने नाबाद राहून एकूण ३१४ धावा आतापर्यंत केल्या आहेत. हे करताना त्याने न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनचा २७१ धावांचा विक्रम मागे टाकला आहे. २०२३ मध्ये चॅपमनने हा विक्रम केला होता. (Tilak Verma)

(हेही वाचा- London मध्ये खलिस्तानी समर्थक आणि भारतीय आले समोरासमोर; भारतीयांनी दिले चोख प्रत्युत्तर, Video viral)

नाबाद राहून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज पाहूया, 

नाबाद ३१४ – तिलक वर्मा (१०७*, १२०*, १९*, ७२*)

२७१ – मार्क चॅपमन (६५*, १६*, १०४*, ७१*, १५)

२४० – एरॉन फिंच (६८*, १७२)

२४० – श्रेयस अय्यर (५७*, ७४*, ७३*, ३६)

२३९ – डेव्हिड वॉर्नर (१००*, ६०*, ५७*, २*, २०)

भारताचा हा डावखुरा फलंदाज टी-२० क्रिकेटमध्ये सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. आणि २०२४ मध्ये पदार्पण झाल्यापासून २१ डावांमध्ये ५८ धावांच्या सरासरीने ७०७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १५६ धावांचा आहे. यात त्याने २ शतकं आणि ३ अर्धशतकं केली आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अजून ३ सामने बाकी आहेत. पुढील सामना २८ जानेवारीला राजकोट इथं होणार आहे. तिलक वर्माने टी-२० संघात भरवशाचा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज असा लौकिक अल्पावधीतच मिळवला आहे.  (Tilak Verma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.