पानिपतचा आहे तो ‘मराठा’! ज्याने फेकला आरपार भाला! 

मराठा सैन्याच्या अनेक हत्यारांपैकी दोन हत्यारे महत्त्वाची असत. एक म्हणजे तलवार आणि दुसरे म्हणजे भाला. अर्थात भाला हा त्याकाळात सर्वच सैनिकांकडून वापरला जायचा. नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले आहे ते भालाफेकितच.

97

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुभेदार नीरज चोप्राने इतिहास घडवला. एका दमात त्याने असा काही लांब पल्ल्यावर भाला फेकला जो जागतिक स्तरावरील स्पर्धेत अव्वल ठरला. असे म्हणतात, पूर्वजांचे प्रतिबिंब पुढच्या-पुढच्या पिढीमध्ये उमटू लागते, तसेच काहीसे नीरज चोप्राच्या बाबतीत घडले. नीरजचे पूर्वज देखील क्षत्रिय, मराठा कुळाचे! ज्यांनी महाराष्ट्रातून उत्तरेच्या दिशेने कूच करत पानिपतमध्ये अहमदशहा अब्दालीच्या भल्या मोठ्या सैन्याशी दोन हात केले. त्याच मराठा वंशातील लढवय्या, क्षत्रिय कुळाचा गुणधर्म नीरजमध्ये उतरला, ज्याने भाला फेकीत त्याचे दर्शन अवघ्या जगाला घडवून दिले.

नीरजची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली! 

संपूर्ण देशाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचे गाव जरी हरियाणात असले, तरी त्याची नाळ एका अर्थाने महाराष्ट्राशी जोडलेली आहे. अर्थातच तिचा संबंध वर्तमानाशी नसून भूतकाळाशी किंवा इतिहासाशी आहे. पानिपतच्या युद्धासाठी मराठे २५७ सालाच्या आधी उत्तरेत गेल्यानंतर युद्धानंतर बरेचसे मराठा सैन्य परत आले. मात्र काही मंडळी किंवा कुटुंबे पानिपतच्या युद्धानंतरदेखील उत्तरेतच राहिली. पानिपत हे हरियाणातच आहे. एवढ्या जबरदस्त युद्धानंतर अनेकांना महाराष्ट्रात परतणे जिवावर आले. ही कुटुंबे तिथेच स्थायिक झाली. स्थानिक भाषा, संस्कृती, चालीरिती त्यांनी स्वीकारल्या. जे मराठे पानिपतच्या युद्धानंतर तिथेच राहिले त्यांना रोड मराठा देखील म्हटले जाते. हरियाणात, विशेषत: पानिपतच्या परिसरात रोड मराठा मोठ्या प्रमाणावर आहेत.

(हेही वाचा : मंत्रालयात गटारी! कुणी रिचवल्या बाटल्या?)

नीरजने वारसा सार्थ ठरवला!

नीरज चोप्राचे कुटुंब अशा या रोड मराठांपैकीच एक आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर आज नीरजने सर्व भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. पहिल्याच ऑलिम्पिक प्रयत्नात त्याने सुवर्णपदक जिंकले. यात योगायोगाचा मोठा भाग म्हणजे पानिपतच्या युद्धासाठी गेलेल्या मराठा सैन्यात पायदळ आणि घोडदळ या दोघांचाही समावेश होता. त्याकाळी मराठा सैन्याच्या अनेक हत्यारांपैकी दोन हत्यारे महत्त्वाची असत. एक म्हणजे तलवार आणि दुसरे म्हणजे भाला. अर्थात भाला हा त्याकाळात सर्वच सैनिकांकडून वापरला जायचा. नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले आहे ते भालाफेकितच. भाल्याने लढणे हे अत्यंक कौशल्याचे काम असायचे. नीरजने आपला वारसा सार्थ ठरवत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची जिद्द दाखवली आहे. मराठा सैन्याने पानिपताच्या रणभूमीवर आपली मर्दुमकी दाखवली आणि नीरजने टोकियोच्या मैदानात. एका अर्थाने मराठ्यांची पानिपतातील भालाफेक ही टोकियोपर्यंत जाऊन पोचली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.