ऑलिम्पिकमधील ‘हे’ आहेत भारताचे ‘रत्न’! ज्यांनी साकारले स्वप्न!  

भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आजवरच्या इतिहासात सर्वाधिक पदके मिळवण्याची कामगिरी केली.

103

भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये उत्तम कामगिरी केली. ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात भाला फेकीत नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून देऊन इतिहास घडवला.

हा आहे भारताचा क्रीडा विश्वातील सन्मान!

सुवर्ण पदक! 

नीरज चोप्रा  – भालाफेकीत नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. नीरजने चौथ्या प्रयत्नांत सर्वोत्तम खेळी केली.

रौप्य पदक! 

मीराबाई चानू – मणिपूर येथील राहणारी मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये २१ वर्षांनंतर भारताला पदक मिळवले. तिने टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिने अत्यंत पराकोटीचा संघर्ष करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. ४८ किलोग्रॅम वजनी गटात मीराबाई चानूने एकूण २०२० किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला.

रवीकुमार दहीया – कुस्तीमध्ये रवीकुमार दहीया याने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्याने ५७ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात हे पदक मिळवून दिले. रवीकुमार आशियायी चॅम्पियन आहे. त्याने २०२० आणि २०२१ यामध्ये विजय मिळवला होता. त्याशिवाय २३व्या वयात त्याने विश्व चॅम्पियनशिप २०१८मध्येही पदक प्राप्त केले होते.

(हेही वाचा : नीरज चोप्राचे ‘हेच’ ट्वीट आज उतरलं सत्यात…! नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद!)

कांस्य पदक 

पीव्ही सिंधू – भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने टोकियो २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. या पदकासाठी झालेल्या सामन्यात तिने चीनच्या बिंगजियाओं हिला हरवले. पी व्ही सिंधू २ ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला आणि दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

हॉकी पुरुष टीम  – ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केले. जर्मनीच्या विरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ५-४ ने जर्मनीचा पराभव केला. याआधी १९८०मध्ये भारतीय हॉकी टीमने पदक मिळवले होते. त्या वेळी वासुदेव भास्करन हे कर्णधार होते, त्यांनी मॉस्कोमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते.

लव्हलिना बोर्गोहाइन – भारताची बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाइन हिने कौतुकास्पद खेळी करत कांस्य पदक मिळवले. लवलीना हिने ६९ किलो ग्रॅम वजनी गटात ही कामगिरी केली. तिने चिनी तैपईच्या नीन-शेन चेनला हिला हरवले. मेरी कॉमच्या नंतर लवलीना हे दुसरी महिला बॉक्सर आहे जिने पदक मिळवले आहे.

बजरंग पुनिया – कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ६५च्या वजनी गटात कझाकिस्तानमधील दौलत नियाजबेकोवचा याला हरवले. त्याने हा सामना ८-० या फरकाने जिंकला. रवी दहियाच्यानंतर बजरंग पुनिया याने कुस्तीत हे पदक मिळवून दिले. कुस्तीत भारताला २ पदके मिळाली.

(हेही वाचा : टोकियो ऑलिम्पिक २०२० : कुस्तीत ‘बजरंगा’ची धमाल!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.