टोकियो ऑलिम्पिक २०२० : कुस्तीत ‘बजरंगा’ची धमाल!

कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आणि भारताच्या पदरात आणखी एका पदकाची भर पडली.

ऑलिम्पिकच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय क्रीडा पटूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. सकाळी गोल्फमध्ये जागतिक क्रमवारीत २०० क्रमांकावर असलेल्या आदिती अशोक हिने थेट तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर येऊन पहिल्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्धीला अडचणीत आणले होते, मात्र शेवटच्या क्षणी तिला अपयश स्वकारावे लागले, मात्र त्यानंतर सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने  हि निराशा भरून काढली आणि कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आणि भारताच्या पदरात आणखी एका पदकाची भर पडली.

बजरंग अशी केली ‘खेळी’!

कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले. उपांत्यपूर्व फेरीत बजरंग ०-१ ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने इराणी कुस्तीपटूला सामन्याबाहेर फेकून दिले. बजरंगने ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या एर्नाझार अक्मातालीववर विजय मिळवला. बजरंगने एकदा किर्गिस्तानच्या कुस्तीपटूवर ३-१ अशी आघाडी घेतली. अक्मातालीने दोन गुण घेत ३-३ अशी बरोबरी साधली. बजरंगने एकसाथ २ गुण मिळवले होते. या आधारावर त्याला विजेता घोषित करण्यात आले.

(हेही वाचा : खेलरत्न पुरस्काराची ओळख आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here