टोकियो ऑलिम्पिक २०२० : हॉकी संघाचा पराभव झाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान?

भारतीय हॉकी टीमला विश्वविजेत्या बेल्जियमने 5-2 ने पराभूत केले.

भारतीय हॉकी टीमचा पराभव झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले, ‘जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा एक भाग आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकी टीमने त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि तेच महत्त्वाचे आहे. टीमला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आमच्या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात झालेली लढत सुरुवातीला खूपच अटीतटीची झाल्याचे पहायला मिळाले. मात्र त्यानंतर भारतीय हॉकी टीमला विश्वविजेत्या बेल्जियमने 5-2 ने पराभूत केले. सामना सुरू होताच बेल्जियमने भारतीय हॉकी टीम विरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय टीमने सुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत बरोबरी केली. यानंतर भारतीय टीमने आणखी एक गोल करत 2-1 ने आघाडी घेतली. मग, बेल्जियमच्या टीमने सुद्धा गोल करत 2-2 ने बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा बेल्जियमच्या टीमने एका मागे एक असे दोन गोल करत 5-2 ने आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

पंतप्रधान मोदी सुद्धा पाहत होते सामना

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा भारत विरुद्ध बेल्जियम उपांत्य फेरीचा सामना लाईव्ह पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन भारतीय टीमला प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले कि, मला माझ्या टीमचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे.

कुस्तीतही निराशा!

हॉकी पाठोपाठ कुस्तीमध्येही भारताच्या पदरी निराशा पडली आहे. सोनम मलिकला फ्री स्टाइल (62 किग्रॅ) वजनी गटात पराभव स्वीकारावा लागला. तिला मंगोलियाच्या बोलोरटुयाक़डून धोबीपछाड मिळाला. सोनम सुरुवातीला आघाडीवर होती. परंतु बोलोरटुयाने सामन्यात पुनरागमन केले आणि स्कोअर 2-2 असा बरोबर केला. त्यानंतर बोलोरटुयाला 2 टेक्निकल पॉइंट मिळाले. याच आधारावर तिचा विजय झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here