आज अवघ्या भारतीयांच्या भारतीय हॉकी पुरुष टीमच्या सामान्याकडे लक्ष होते. सुवर्ण पदक हातून निसटून गेल्यानंतर भारतीय हॉकी टीम कांस्य पदक तरी मिळविल आणि ४१ वर्षांचा ऑलिम्पिकमधील हॉकीचा पदकाचा दुष्काळ संपेल, अशी अशा होती, हि आशा आज अखेर पूर्ण झाली. भारतीय हॉकी टीमने जर्मनीवर मात करून इतिहास रचला.
१९८०नंतर मिळवले पदक!
उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला पराभूत केले. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.
A HISTORIC COMEBACK! 🥉🙌#IND men’s #hockey team came back 3-3 in the first-half against #GER and took the lead in the final 30 minutes to win the match 5-4 and the #bronze medal 🙌#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether pic.twitter.com/acZHNxR5Py
— Olympic Khel (@OlympicKhel) August 5, 2021
(हेही वाचा : टोकियो ऑलिम्पिक २०२० : भालाफेकमध्ये पदकाची आशा पल्लवीत)
हा दिवस देशाच्या स्मरणात राहील! – पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. “ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
Historic! A day that will be etched in the memory of every Indian.
Congratulations to our Men’s Hockey Team for bringing home the Bronze. With this feat, they have captured the imagination of the entire nation, especially our youth. India is proud of our Hockey team. 🏑
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021
कुस्तीपटू फोगट उपांत्यफेरीत दाखल!
भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने ऑलिम्पिकमधील ५३ किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सकाळी झालेल्या सामन्यामध्ये विनेशने आपल्या प्रतिस्पर्ध्याला ७-१ च्या स्कोअरसहीत धोबीपछाड देत ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. विनेशने स्वीडनच्या सोफिया मेडालेना हिला ७-१ ने पराभूत केले.
गुरुवार महत्वाचा दिवस!
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा गुरुवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. कांस्यपदकाच्या लढतीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीवर मात केली, तरी देशाचे अनेक खेळाडू आज पदके जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावतील. दीपक पूनिया आणि अंशु मलिक रेपेचेज फेरीत प्रवेश करतील. याशिवाय केटी इरफान, संदीप कुमार आणि राहुल रोहिल्ला अॅथलेटिक्समध्ये 20 किमी रेसवॉकच्या स्पर्धेत आव्हान देतील.
Join Our WhatsApp Community