भारतीय क्रीडापटूंनी आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये ३ पदके निश्चित केली आहेत. त्यामध्ये आता भालाफेकमध्येही पदक मिळेल, अशी आशा नीरज चोप्राच्या उत्तम कामगिरीमुळे भारतीयांच्या मनात निर्माण झाली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने बुधवारी पार पडलेल्या अ गटातील पात्रताफेरीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता नीरज आता पदकापासून अवघ्या १ पाऊलच दूर आहे.
Tokyo Olympics: Javelin thrower Neeraj Chopra qualifies for men's final in first attempt
Read @ANI Story | https://t.co/QErTSMHDKM#Tokyo2020 #IndiaAtOlympics #JavelinThrow pic.twitter.com/YpwTTFpn4x
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2021
उत्तम कामगिरीने पोहचला अंतिम फेरीत!
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेले रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने आपले पदक शुक्रवारी झालेल्या सामन्यामधील विजयासहीत निश्चित केले आहे. आता यात भालाफेकची भर पडणार आहे. नीरज चोप्राला त्याच्या कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. मात्र हे उत्तम १२ खेळाडू गट अ आणि ब मधून एकत्रितपणे निवडले जातात. ब गटामधील स्पर्धा अजून बाकी आहे. तसेच अ गटामधील काही स्पर्धकही अजून शिल्लक आहेत. मात्र असे असले तरी नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मात्र फिनलॅण्डच्या लेस्सी इतीलातोलोसुद्धा अशाचप्रकारे अंतिम फेरीमध्ये गेला आहे. भारताने यंदा ऑलिम्पिकसाठी १२७ खेळाडू पाठवले आहेत.
(हेही वाचा : टोकियो ऑलिम्पिक २०२० : हॉकी संघाचा पराभव झाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान?)
महिला हॉकी टीम इतिहास घडवणार!
ऑलिम्पिकमध्ये प्रथमच उपांत्य फेरी गाठून भारतीय महिला हॉकी संघाने आधीच इतिहास घडवला आहे. आज होणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाला नमवून अंतिम फेरीचे जाण्याचे लक्ष्य या संघापुढे आहे. १८ निर्भीड महिला हॉकीपटूंनी सोमवारी तीन वेळा ऑलिम्पिक विजेत्या ऑस्ट्रेलियाला १-० असा अनपेक्षित धक्का दिला. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरचे ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौरने गोलमध्ये रूपांतर करीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले.
Join Our WhatsApp Community