‘बजरंग’ उपांत्य फेरीत पोहचला! महिला हॉकी टीमची मात्र निराशा! 

भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिममध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

भारताचा कुस्तीपटू रविकुमार दहियाने रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर भारतीयांच्या नजरा भारताची महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला आणि ६५ किलो वजनी गटातील कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर लागल्या होत्या. सुरूवातीच्याच सामन्यात सीमा बिस्लाचा पराभव झाला. मात्र, बजरंग पुनियाने सलग दोन सामन्यात जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत भारतीयांच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या. बजरंगने इरानच्या पैलवानाला नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

बजरंग पुनियाने क्वार्टर फायनल सामन्यात इरानचा पैलवान मोर्टेझा घियासी याला पराभूत केले. बजरंगने २-१ ने हा सामना जिंकला. विजयाबरोबर बजरंगने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. बजरंग सुरुवातीला या सामन्यात ०-१ ने पिछाडीवर राहिला. बजरंगने पहिल्या टप्प्यात डिफेंसिव्ह खेळणे पसंत केले. त्याच्या विरुद्ध पॅसिव्ह क्लॉक सुरु केला गेला, परंतु बजरंग डगमगला नाही.

(हेही वाचा : फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने का सोडला बार्सिलोना क्लब? किती होती त्याची कमाई?)

पदकाचे स्वप्न भंगले, पण लेकी लढल्या! 

भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिममध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले, कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय संघाला ब्रिटनकडून ३-४ ने पराभव स्विकाराला लागला. परंतु टीम इंडियाने पूर्ण टूर्नामेंटमध्ये दर्जेदार प्रदर्शन केले. भारतीय महिला संघ पहल्यांदाच ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली. महिला हॉकी संघाने जर असेच प्रदर्शन सुरु ठेवले, तर तो दिवस दूर नाहीय ज्या दिवशी महिला हॉकी संघ सुवर्ण पदक जिकेल, असा विश्वास संघाच्या प्रशिक्षकाने व्यक्त केला.

भारताची कुस्तीपटू सीमा बिस्ला पराभूत

महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला पराभूत झाली. तिला ट्यूनीशियाच्या सारा हमदीने 1-3 ने पराभूत केले. सीमा सुरुवातीपासूनच या सामन्यात पिछडीवर राहिली होती. मध्यंतरानंतर ती ०-१ ने पिछाडीवर होती. ही मॅच तिची प्री-क्वार्टर मॅच होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here