कार्तिक रन आऊट; का होतोय ट्रोल?

94

क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो एखाद्याच करिअर एका रात्रीत घडवूही शकतो  तसचं उद्धवस्तही करू शकतं. याचाच प्रत्यय मागच्या दोन दिवसात आला. आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या कोलकाता विरूद्ध गुजरात सामन्यात रिंकू सिंगच्या खेळीमुळे जगतभरातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सोमवारी झालेल्या बंगळूर विरूद्ध लखनऊ सामन्यात दिनेश कार्तिककडून झालेल्या एका चुकीमुळे तो ट्रोल होऊ लागला आहे.

नेमकं काय घडलं?

आरसीबीने प्रथम फलदांजी करताना २१२ धावांचे आव्हान लखनऊ समोर ठेवले. या धावांचा पाठलाग करत लखनऊ शेवटच्या षटकापर्यंत आली. हर्षल पटेल शेवटचं षटक टाकत होता. सहा चेंडूत पाच धावांची आवश्यकता लखनऊला होती.  त्याचवेळी जयदेव उनाडकट बाद झाला. लखनऊवर दबाव वाढत होता, मैदानात आलेल्या रवी बिश्नोईने दोन चोरट्या धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर लखनऊला एक धाव हवी होती. आवेश खान शेवटच्या चेंडूचा सामना करत होता. चेंडू मागे असलेल्या यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे गेला पण त्याला तो चेंडू नीट पकडता न आल्याने आवेश खान आणि रवी बिश्नोईला एक धाव काढता आली आणि हा सामना लखनऊने एक गडी राखून जिंकला. यामुळे दिनेशला ट्रोल केले जात आहे.

(हेही वाचा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची माहिती प्रसारित करण्यास वृत्तवाहिन्यांना न्यायालयाची मनाई)

धोनीच्या ‘त्या’ रन आऊट बरोबर तुलना

२०१६ ला झालेल्या टी ट्वेंटी विश्व चषकाच्या भारत विरूद्ध बांग्लादेशच्या उपांत्यपूर्व सामान्यात शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर दोन धावा पाहिजे होत्या. चेंडू यष्टिरक्षक असलेल्या धोनीकडे गेला आणि त्याने हुशारीने रन आऊट केले. आणि भारत त्या विजयामुळे उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. याचवरून  नेटकऱ्यांनी धोनी आणि कार्तिकची तुलना करायला सुरूवात केली. काहींनी कार्तिकवर टीका केली तर काहींनी त्याची बाजू घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.