-
ऋजुता लुकतुके
२०२१ च्या एका खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुशील कुमारला (Sushil Kumar) अखेर नियमित जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये (Chhatrasal Stadium) देशातील अनेक कुस्तीपटू सराव करतात. इथं दहशत माजवून एका प्रशिक्षणार्थीला मारहाण केल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. २०२१ च्या या प्रकरणात त्या कुस्तीपटूचा नंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणी, सुशील कुमार (Sushil Kumar) मे २०२१ पासून अटकेत होता. जुलै २०२३ मध्ये एकदा सुशीलला गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी ७ दिवसांचा जामीन मिळाला होता.
सुशीलने कोर्टात दावा करताना आपण निर्दोष असल्याचं तसंच आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं म्हटलंय. ‘सुशील मागची साडेतीन वर्षं तुरुंगात आहे. या प्रकरणी, सर्व साक्षी पुरावे सादर झाले आहेत. आणि कुठेही सुशील कुमारचं (Sushil Kumar) नाव आलेलं नाही. पुरेशा पुराव्या अभावी बराच काळ तुरुंगात गेल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता सुशीलला (Sushil Kumar) जामीन मंजूर करण्यात येत आहे,’ असं दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव नरुला (Sanjeev Narula) यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Aus : रोहित आणि विराट, दोघंही कुलदीपवर का चिडले?)
#WATCH | Delhi: On wrestler Sushil Kumar granted bail, his counsel Advocate R S Malik says, “There has been a long delay. He has been in jail for the last 3.5 years. All witnesses have been examined. No evidence has been presented against him so far. The court considered this as… pic.twitter.com/d7m1wKbnVw
— ANI (@ANI) March 4, 2025
सुशीलला (Sushil Kumar) जामिनासाठी ५०,००० रुपयांचा बाँड न्यायालयाला सादर करायचा आहे. तसंच दोन जणांचं हमीपत्रही द्यायचं आहे. सुशील आणि त्याचे काही साथीदार ज्युनिअर कुस्तीपटू सागर धनकरच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. एका जागेच्या वादावरून सुशील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर आणि मित्रांवर हल्ला करून त्यांना मारहाण केली होती. त्यात झालेल्या जखमांमुळे सागरचा मृत्यू झाला. आणि हे प्रकरण बाहेर आलं.
(हेही वाचा – आपल्या विभागातील उद्यान, मैदानांची देखभाल होते का? नेमलेले Contractor काम करतात का? कोणत्या आहेत ‘या’ कंपन्या? जाणून घ्या)
या प्रकरणानंतर १८ दिवस सुशील (Sushil Kumar) फरार होता. तो दिल्ली तसंच आजूबाजूच्या राज्यांत लपून जामीन आणि इतर न्यायालयीन प्रक्रियेतून सूट मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिला. अखेर दिल्लीच्या मुंडका भागात तो स्वत: पोलिसांसमोर दाखल झाला. ऑक्टोबर २०२२ मध्ये कोर्टात सुशील आणि त्याच्या १७ सहकाऱ्यांवर खून, गुंडगिरी, कट आणि दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. मारहाणीच्या व्हिडिओत सुशील (Sushil Kumar) दूर उभा दिसत आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तोच म्होरक्या असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
सुशील (Sushil Kumar) हा भारताचा यशस्वी कुस्तीपटू असून त्याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कुस्ती कांस्य तर लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community