भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा 30 डिसेंबरला मोठा अपघात झाला. या अपघातात क्रिकेटपटू भीषण जखमी झाला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि गुडघ्याला फार दुखापत झाली होती. त्याला लगेचच जवळील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर, त्याला डेहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. आता सध्या ऋषभ पंतला आयसीयूमधून प्रायव्हेट वाॅर्डला शिफ्ट करण्यात आले आहे. आता त्याच्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
ऋषभ पंतविषयी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) ने मोठा निर्णय घेतला आहे. DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर इथे उपचार केले जाणार आहेत. डीडीसीएचे संस्थापक श्यान शर्मा म्हणाले, क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी बुधवारी मुंबईला हलवण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंतवर डेहरादूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
( हेही वाचा: टीम इंडियाने ऋषभ पंतसाठी शेअर केला खास व्हिडिओ! प्रशिक्षक द्रविडसह काय म्हणाला नवा कर्णधार पंड्या? )
IPL 2023 मध्ये खेळण्याबाबत शंका
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर पंत दुबईला पोहोचला होता. तेथून तो 29 डिसेंबरला दिल्लीला आला आणि तेथून खासगी कारने रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. श्रीलंकेविरुद्धच्या टी- 20 आणि वनडे मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आता दुखापतीनंतर पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि आयपीएल 2023 मध्ये खेळण्यावर साशंकता आहे.
Join Our WhatsApp Community