-
ऋजुता लुकतुके
देशांतर्गत हंगामात सध्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची धूम सुरू आहे. यात गुजरात विरुद्ध त्रिपुरा सामन्यात इतिहास घडताना पाहयाला मिळाला. गुजरातकडून उर्विल पटेलने चक्क २८ चेंडूंतच शतक झळकावलं. भारतीय खेळाडूने टी-२० प्रकारात केलेलं हे सगळ्यात जलद शतक ठरलं आहे. विशेष म्हणजे नुकत्या पार पडलेल्या लिलावात उर्विलवर एकाही संघाने बोली लावली नव्हती. लगेचच उर्विलने आपल्या बॅटने संघ मालकांना उत्तर दिलं आहे. (Urvil Patel)
(हेही वाचा- महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना राज्यस्तरीय Best Principal पुरस्कार प्रदान )
टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतक हे भारतीय वंशाच्या पण, एस्टोनियाकडून खेळणाऱ्या साहील चौहानने झळकावलं आहे. आयसीसीच्या एका स्पर्धेत याच वर्षी सायप्रस विरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. बुधवारी उर्विलही या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता. एका चेंडूने त्याचा विक्रम हुकला. (Urvil Patel)
एकूण ३५ चेंडूंत त्याने नाबाद ११३ धावा केल्या. आयात १२ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली. उर्विलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने २० षटकांत २५६ धावांचा डोंगर उभा केला. २६ वर्षीय उर्विलची क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये उर्विल आतापर्यंत ६ सामने खेळला आहे. आणि यात त्याने १५८ धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यतची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे ती ६०. त्याचा स्ट्राईक रेट १५४.३२ इतका तगडा आहे. (Urvil Patel)
(हेही वाचा- Accident News: आयशर – पिकअपच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू; ६ गंभीर जखमी)
टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतकं,
२७ चेंडू – साहील चौहान वि. सायप्रस २०२४
२७ चेंडू – उर्विल पटेल (गुजरात वि. त्रिपुरा, २०२४)
३० चेंडू – ख्रिस गेल (बंगळुरू वि. पुणे, आयपीएल २०१३)
३२ चेंडू – रिषभ पंत (दिल्ली वि. हिमाचल प्रदेश, २०१८)
३३ चेंडू – डब्ल्यू ल्युब (नॉर्थ वेस्ट वि. लिम्पोपो, २०१८)
३३ चेंडू – यान निकोल लॉफ्टी (नामिबिया वि. नेपाळ, २०२४)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community