- ऋजुता लुकतुके
युएस ओपन टेनिस स्पर्धेत (US Open 2025) मानांकित खेळाडूंच्या पराभवाचा सिलसिला सुरूच आहे. तर भारताच्या रोहन बोपान्नाचं मिश्र दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. रोहन बोपन्ना आणि इंडोनेशियाची अल्दिला सुत्जियादी या ८व्या मानांकित जोडीला अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड आणि डोनाल्ड यंग यांनी ६-३, ६-४ ने पराभूत केले.
न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅमच्या महिला एकेरीत अमेरिकेची टेनिस स्टार एम्मा नवारोने स्पेनच्या पॉला बेडोसाचा ६-२, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत प्रवेश केला. गुरुवारी तिची दुसऱ्या मानांकित एरिना सबालेन्काशी लढत होईल. बेलारशियन स्टार सबालेंकाने चीनच्या ७व्या मानांकित झेंग कियानवेनचा ६-१, ६-२ असा पराभव केला.
(हेही वाचा – Rich Indian Cricketers : कुठला भारतीय क्रिकेटपटू भरतो सर्वाधिक आयकर?)
पुरुष एकेरीत चौथा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवला पराभवाचा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने त्याचा पराभव करत उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. १३व्या मानांकित नवारोने पहिला सेट २९ मिनिटांत जिंकला, परंतु दुसऱ्या सेटमध्ये २६व्या मानांकित बेडोसाने ५-१ अशी आघाडी घेतली होती. पण, त्यानंतर नवारोने सलग सहा गेम जिंकून उपान्त्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. नवारोने चौथ्या फेरीत गतविजेत्या कोको गॉफचा पराभव केला. या मोसमापूर्वी तिने यूएस ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये एकही सामना जिंकला नव्हता.
पुरुष एकेरी गटात १२व्या मानांकित टेलर फ्रिट्झने चौथ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. त्याने जर्मन स्टारचा ७-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. हा सामना ३ तास २६ मिनिटे चालला. अमेरिकन स्टारचा सामना त्याच्याच देशाच्या फ्रान्सिस टियाफोशी होईल. चौथ्या सेटमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे टियाफोला पुढेचाल मिळाली. (US Open 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community