-
ऋजुता लुकतुके
युएस ओपनच्या इतिहासातील सगळ्यात लांब चाललेला सामना फ्लशिंग मेडोवर सोमवारी पाहायला मिळाला. हा सामना होता क्रमवारीत २३व्या स्थानावर असलेला रशियाचा कॅरन कॅचनोव्ह विरुद्ध क्रमवारीत २८ व्या स्थानावर असलेला ग्रेट ब्रिटनचा डॅनिएल इव्हान्स. ५ तास आणि ३५ मिनिटांच्या झुंजीनंतर इव्हान्सने ०-४ अशी पिछाडी भरून काढत सामना ६-७, ७-६, ७-६, ४-६ आणि ६-४ असा जिंकला. सामन्यातील प्रत्येक टाय-ब्रेकरही रंगतदार झाला. (US Open Longest Game)
(हेही वाचा- Jay Shah ICC President : ‘जय शाह अध्यक्ष झाल्यामुळे क्रिकेट जगभर पसरले,’ – सुनील गावसकर )
खरंतर पाचव्या सेटमध्ये कॅचनोव्हने ४-० अशी आघाडी मिळवली होती. तो विजयाकडे कूच करताना दिसतही होता. त्याचे आक्रमक आणि जोरकस फटके अचूक बसत होते. त्याने दोनदा इव्हान्सची सर्व्हिस भेदली. पण, अचानक इव्हान्सने खेळाचा नूरच पालटला. (US Open Longest Game)
5 HOURS AND 35 MINUTES!!!
Take a bow, Dan Evans and Karen Khachanov 👏 pic.twitter.com/noiPnkVDGU
— US Open Tennis (@usopen) August 27, 2024
सामना रंगतदार होऊ लागला तशी कोर्ट क्रमांक ६ वर चाहत्यांची गर्दी वाढली. त्यांनी रशियन खेळाडूविरुद्ध खेळणाऱ्या इव्हान्सला जोरदार पाठिंबा दिला. त्याचाही परिणाम खेळावर झाला असावा. इव्हान्सने पिछाडीवरून बाजी मारताना अक्षरश: जीवाची बाजी लावली. प्रत्येक गुण तो जीव तोडून खेळत होता. त्याचं प्रत्येक यश चाहते साजरं करत होते. सामन्यातील प्रत्येक सेट किमान एक तास चालला. त्यातही तिसरा सेट ७२ मिनिटं चालला. (US Open Longest Game)
(हेही वाचा- Army Truck Accident: लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळून भीषण अपघात, तीन जवान हुतात्मा, चार जखमी)
अखेर ०-४ अशा पिछाडीनंतर सलग ६ गेम जिंकत इव्हान्सने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. यापूर्वीव सगळ्यात लांब चाललेल्या सामन्याचा विक्रम स्टिव्हन एडबर्ग विरुद्ध मायकेल चँग असा झाला होता. १९९२ चा उपान्त्य फेरीचा हा मुकाबला एडबर्गने ६-७, ७-५, ७-६, ५-७ आणि ६-४ असा जिंकला होता. हा सामना ५ तास २४ मिनिटं चालला होता. (US Open Longest Game)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community