
-
ऋजुता लुकतुके
युएस टेनिस असोसिएशनने यंदा युएस ओपन टेनिस स्पर्धेसाठी एक वेगळाच पायंडा पाडायचं ठरवलं आहे. स्पर्धेतील मिश्र दुहेरी हा प्रकार मुख्य स्पर्धेपासून वेगळा काढून स्पर्धेच्या एक आठवडा आधी तो भरवण्याचा आयोजकांचा विचार आहे. नेहमीच्या तुलनेत स्पर्धेचा आकारही छोटा असेल. १६ निवडक संघ यात भाग घेतली आणि मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मिश्र दुहेरी संपलेली असेल अशी आयोजकांची योजना असेल. मुख्य स्पर्धा १९ ऑगस्टपासून होणार आहे. (US Open Mixed Double Controversy)
मिश्र दुहेरीत ८ संघ त्यांच्या क्रमवारीनुसार निवडण्यात येतील आणि इतर ८ संघांना वाईल्डकार्ड प्रवेश मिळेल. खरंतर मिश्र दुहेरीचे सामनेही न्यूयॉर्कमधील प्रतीष्ठेच्या आर्थर ॲश आणि लुई आर्मस्ट्राँग स्टेडिअमवर व्हावेत यासाठी ही योजना आहे. पण, त्या नादात मुख्य स्पर्धेपासून मिश्र दुहेरी वेगळी झाल्यामुळे या निर्णयावर टीकाच जास्त होतेय. या प्रकाराचं खच्चीकरण होत असल्याचा आरोप टेनिस वर्तुळातच होत आहे. (US Open Mixed Double Controversy)
(हेही वाचा – मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार – मत्स्यव्यवसाय मंत्री Nitesh Rane)
दुहेरीतील माजी नंबर वन खेळाडू पॉल मॅनमेमीने या निर्णयावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. ‘मिश्र दुहेरीत युएस ओपन जे बदल करू इच्छितेय ते अजिबात योग्य नाहीत. एका सेटमध्ये चार गेम अशी तर मी कल्पनाच करू शकत नाही. यावर्षी मिश्र दुहेरीला काहीच महत्त्व नसेल आणि या स्पर्धेतील विजेता हा खराखुरा मिश्र दुहेरी विजेता नसेल. या विजयाला काहीच अर्थ नसेल. मला या निर्णयाने खूप मोठा धक्का बसला आहे,’ असं पॉल ट्विटरवर व्यक्त होताना म्हणाला. (US Open Mixed Double Controversy)
Mixed @usopen wants eyeballs, but excluding top doubles players and playing sets to 4 makes a mockery of a Grand Slam title. I’d support the move to Fan week if they retain the same draw size & format. If you start devaluing a Slam, where does the slippery slope end? Rethink pls
— 🎗️ Paul McNamee (@PaulFMcNamee) February 12, 2025
गतवर्षीचे विजेते सारा इरानी अँड्र्यू वावासोरी यांनी आयोजकांचा हा निर्णय म्हणजे मिश्र दुहेरीवर सगळ्यात मोठा अन्याय असल्याचं म्हटलंय. मिश्र दुहेरीच्या खेळाडूंना सापत्न वागणूक मिळतेय. आणि हा निर्णय मागे घेण्यात यावा असी विनंती या दोन खेळाडूंनी केली आहे. ‘युएस ओपनमधील मिश्र दुहेरी स्पर्धा म्हणजे मूळ फॉरमॅटची खूप मोठी मोडतोड आहे. मुख्य स्पर्धा रद्द होऊन काही तरी मनोरंजनाचा मसाला भरण्याची आयोजकांची योजना आहे. यांना फार फार तर प्रदर्शनीय सामने म्हणता येतील. ही स्पर्धा नव्हे,’ असं दोघांनी म्हटलं आहे. (US Open Mixed Double Controversy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community