USA : सगळ्यात कमी धावसंख्या असूनही विजय मिळवण्याचा विक्रम आता अमेरिकेच्या नावावर

१२२ धावा करूनही अमेरिकेनं हा सामना ५७ धावांनी जिंकला

85
USA Shatter India’s Record : सगळ्यात कमी धावसंख्या असूनही विजय मिळवण्याचा विक्रम आता अमेरिकेच्या नावावर
USA Shatter India’s Record : सगळ्यात कमी धावसंख्या असूनही विजय मिळवण्याचा विक्रम आता अमेरिकेच्या नावावर
  • ऋजुता लुकतुके

पूर्ण ५० षटकं खेळल्या गेलेल्या सामन्यात सगळ्यात कमी धावसंख्या असूनही मोठा विजय मिळवण्याचा भारताचा ४० वर्षं जुना विक्रम मोडीत निघाला आहे. अमेरिकेनं (USA) १२२ धावा केल्या असताना ओमानला ६५ धावांत गुंडाळलं. आणि ५७ धावांनी मोठा विजय साकार केला. आयसीसीच्या असोसिएट आणि वरिष्ठ गटातील सदस्य देशांत हा नवीन विक्रम आहे. यापूर्वी १९८५ मध्ये भारताने १२५ धावा करुवही पाकिस्तान विरुद्ध ३८ धावांनी विजय मिळवला होता.

अमेरिकन विजयामध्ये डावखुरा फिरकीपटू नॉतुश केंजिगेनं ७ षटकांत ११ धावा देत ५ बळी मिळवले. तोच सामन्यात सर्वोत्तम ठरला. ओमानकडून कर्णधार जतिंदर सिंगने (Jatinder Singh) सर्वाधिक ७ धावा केल्या. तो मैदानावर होता तोपर्यंत ओमानला विजयाच्या आशाही होत्या. पण, भारतीय वंशाच्या मिलिंद कुमारने (Milind Kumar) जितिंदरला बाद केलं. आणि तिथे सामना अमेरिकेच्या बाजूने पूर्णपणे झुकला. मिलिंदने १७ धावांत २ बळी मिळवले. यासिर मोहम्मदने (Yasir Mohammad) ३ तर हरमित सिंगने १ बळी मिळवला. ओमान इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला गेला. आणि २०२१ च्या टी-२० विश्वचषकाचे काही सामनेही इथे झाले होते. पण, त्या स्पर्धेच्या तुलनेत आता इथे गोलंदाजांना चांगलीच मदत मिळत होती. आणि खेळपट्टीचा दर्जाही घसरलेला होता.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघात बेबनाव? स्टार यष्टीरक्षक गंभीरवर चिडला?)

२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा म्हणून ही मालिका खेळवली जात आहे. असोसिएट सदस्यांची वर्षभरातील आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहून २०२७ चे सहभागी देश ठरवण्यात येणार आहेत. आणि त्या दृष्टीने अमेरिकन संघ चांगला फॉर्मात आहे. ओमाननेही आधीच्या सामन्यात नामिबियाला हरवलं होतं. पण, अमेरिकेविरुद्धच्या पराभवाने संघाचं नुकसान केलं आहे.

अमेरिकेकडून या सामन्यात एरॉन जोन्स (१६), संजय कृष्णमूर्ती (१६) यांनी धावा केल्या. तर मिलिंद कुमारने (Milind Kumar) नाबाद ४७ धावा करत अमेरिकेला १०० च्या पार नेलं. ३१ व्या षटकांतच अमेरिकन संघ सर्वबाद झाला. ओमानचं पारडं तोपर्यंत जड होतं. पण, पुढे त्यांचीही फलंदाजी ढेपाळल्यामुळे अमेरिकेचा विजय साध्य झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.