बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात, खेळाडू आणि प्रशिक्षक जखमी

163

बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा शुक्रवारी अपघात झाला आहे. आंध्र प्रदेश येथे सामना खेळण्यासाठी जाणा-या या संघाचा विशाखापट्टणम येथे अपघात झाला आहे. संघाच्या बसची एका ट्रकशी धडक झाली असून या अपघातात संघाचे प्रशिक्षक आणि काही खेळाडू जखमी झाले आहेत. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

खेळाडू आणि प्रशिक्षक जखमी

विशाखापट्टणम येथील ज्ञानपुरा येथे बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसची एका ट्रकशी धडक झाली आहे. या अपघातात ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून प्रशिक्षक आणि चार महिला खेळाडू जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या सर्व जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांना रुग्णालयातून बडोदा येथे पाठवण्यात आले आहे.

बडोदा संघाची चांगली कामगिरी

आंध्र प्रदेश येथील विजयनगरम येथे झालेल्या स्पर्धेत बडोदाच्या महिला क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली आहे. संघाने 4 टी-20 सामन्यांत 3 सामने जिंकले आहेत. मुंबईने मात्र बडोद्याला सामन्यात मात दिली आहे. 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात बडोदा संघाने सौराष्ट्रचा 7 गडी राखून पराभव केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.