इंटरनॅशनल जपान कराटे असोसिएशन संलग्न वीर सावरकर कराटे अॅकेडमीच्या विद्यार्थिनी नारायणी पाटील आणि कशिश थापा यांनी मुंबई जिल्हास्तरीय शालेय वार्षिक क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. धारावी येथील जिल्हा क्रीडा कार्यलयाच्या सभागृहात शनिवार, १७ डिसेंबरला जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
( हेही वाचा : लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधात सकल हिंदू एकवटले! पिंपरी-चिंचवड येथे विराट मोर्चा )
नारायणी पाटीलने १७ पेक्षा कमी वयोगटात सहभाग नोंदवत, ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तर कशिश थापाने १९ पेक्षा कमी वयोगटात, ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. वीर सावरकर कराटे अॅकेडमीच्या या विद्यार्थिनी विभागीय (Division ) स्पर्धांसाठी पात्र ठरल्या आहेत, यातील विजेते राज्यस्तरीय स्पर्धा खेळतील.
जिल्हास्तरीय शालेय वार्षिक क्रिडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या मुलांना दहावीला अतिरिक्त गुण दिले जातात. जिल्हास्तरीय स्पर्धेत पदक जिंकल्यावर अतिरिक्त ५ गुण, विभागीय स्पर्धा खेळल्यास १०, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ तर, नॅशनल लेव्हल स्पर्धांसाठी अतिरिक्त २५ गुण दिले जातात. नारायणी पाटील गेल्या ७ वर्षांपासून, तर कशिश गेली दीड वर्ष वीर सावरकर कराटे अॅकेडमीमध्ये अनिल पाटील, दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
या अॅकेडमीचे प्रशिक्षक अनिल पाटील, दत्तात्रय कदम यांनी महात्मा फुले मार्केट मुंबई पब्लिक स्कूल, सीताराम मिल कपाऊंड लोअर परेल, महालक्ष्मी स्कूल या तीन महापालिका शाळांमधील मुलांना मोफत प्रशिक्षण दिले होते. या मुलांनी सुद्धा जिल्हास्तरीय स्पर्धेत ३ सुवर्ण,५ रौप्य आणि ७ कांस्य पदके जिंकली.
Join Our WhatsApp Community