Vidhan Bhavan Felicitation: विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार

60
टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक; CM Eknath Shinde यांची घोषणा

तब्बल १३ वर्षांनी विश्वकप जिंकलेली टीम इंडिया अखेर मायदेशी परतली आहे. टीममधील खेळाडूंच्या स्वागतासाठी सर्वच उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत आली. यावेळी मुंबईत नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान, T-२० विश्वकपसह (T-20 World Cup) खेळाडूंची ओपन डेस्क बसमधून विययी यात्रा काढण्यात आली. मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या चारही मुंबईकर खेळाडूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिमंडळात सत्कार करण्यात आला. (Vidhan Bhavan Felicitation)

(हेही वाचा – Gokul Milk Price Hike: गोकुळचे दूध महागले; जाणून घ्या नवे दर)

T-२० विश्वचषक जिंकणाऱ्या रोहित शर्मासह ४ खेळाडूंचे राज्य सरकारच्या वतीने विधीमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या सभागृहात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला. यावेळी चारही खेळाडूंना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस देखील देण्यात आले. संघाच्या यशात सर्व खेळाडूंचा सहभाग असल्याचे रोहित शर्मा यांनी म्हटले आहे. विश्वचषक जिंकणे हे आमचे स्वप्न होते, असे देखील रोहित शर्मा यांनी म्हटले आहे. ‘मुंबईचा राजा, रोहित शर्मा’ (Mumbaicha Raja, Rohit Sharma) अशी घोषणाबाजी यावेळी सभागृहात करण्यात आली.  (Vidhan Bhavan Felicitation)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.