Vijay Hazare Trophy : नवख्या त्रिपुराचा गतविजेत्या सौराष्ट्रला दे धक्का

नवख्या त्रिपुरा संघाने गतविजेत्या आणि चेतेश्वर पुजारा तसंच जयदेव उनाडकट यांचा समावेश असलेल्या सौराष्ट्र संघाला विजय हजारे करंडक स्पर्धेत धूळ चारली.

115
Vijay Hazare Trophy : नवख्या त्रिपुराचा गतविजेत्या सौराष्ट्रला दे धक्का
Vijay Hazare Trophy : नवख्या त्रिपुराचा गतविजेत्या सौराष्ट्रला दे धक्का
  • ऋजुता लुकतुके

नवख्या त्रिपुरा संघाने (Tripura Team) गतविजेत्या आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) तसंच जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) यांचा समावेश असलेल्या सौराष्ट्र संघाला विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) धूळ चारली. (Vijay Hazare Trophy)

विजय हजारे चषकाच्या अ गटातील एका महत्त्वपूर्ण सामन्यात त्रिपुरा संघाने चक्क गतविजेत्या सौराष्ट्र संघाला १४८ धावांनी धूळ चारली. विशेष म्हणजे सौराष्ट्र संघात चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनाडकट हे दोन राष्ट्रीय संघातून खेळलेले खेळाडू होते. (Vijay Hazare Trophy)

बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात झालेल्या या साखळी सामन्यात त्रिपुरा संघाने पहिली फलंदाजी करताना ८ बाद २५८ धावा केल्या. विक्रम कुमार दास आणि सुदीप चॅटर्जी यांच्या अर्धशतकांमुळे संघाला ही मजल मारता आली. तर सौराष्ट्राकडून जयदेव उनाडकटने पाच गडी बाद केले. त्रिपुराकडून गणेश सतीशने शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करत ७१ धावा केल्या. त्यामुळे संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला. (Vijay Hazare Trophy)

(हेही वाचा – Mark Zuckerberg : सकाळी ८ वाजता उठतात मार्क झुकरबर्ग, कशी असते फेसबुक संस्थापकांची दिनचर्या?)

त्रिपुराच्या २५८ धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाचा जम कधी बसलाच नाही. त्यांची सुरुवातच ३ बाद १३ अशी बिकट झाली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वासवदा यांनी ३७ धावांची भागिदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पुजारा २४ आणि अर्पित १६ धावांवर बाद झाले आणि पुढील संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. शेवटी ३२व्या षटकातच सौराष्ट्र संघ ११० धावांवर सर्वबाद झाला. (Vijay Hazare Trophy)

जयदेव देबने १५ धावांत ५ बळी टिपले. या हंगामातील त्रिपुराचा हा पहिलाच विजय आहे. (Vijay Hazare Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.