- ऋजुता लुकतुके
भारताच्या राष्ट्रीय टी२० संघात आता आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंचा बोलबाला दिसू लागला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रमणदीप सिंग आणि विजयकुमार व्यक्ष या दोन नवीन खेळाडूंची निवड झाली आहे. दोघांनी या हंगामात आयपीएलमध्ये आपापल्या संघांसाठी दमदार कामगिरी केली होती. शिवम दुबे, मयंक यादव आणि रियान पराग हे तीन खेळाडू दुखापतींमुळे संघाबाहेर आहेत आणि त्यामुळेच या दोघांना संधी मिळाली आहे. (Vijaykumar Vyshak)
‘मयांक यादव आणि शिवम दुबे दुखापतींमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. शिवम रणजी हंगामही खेळत नाहीए. तर रियान परागही दुखापतग्रस्त असून तो बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे,’ असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (Vijaykumar Vyshak)
(हेही वाचा – महाराष्ट्र काँग्रेस हरियाणाच्या वाटेवर; Rahul Gandhi राज्यातील नेत्यांवर नाराज)
All the details of #TeamIndia’s squad announcement for tour of South Africa & Border-Gavaskar Trophy 🔽#SAvIND | #AUSvINDhttps://t.co/EW5yZdsHcj
— BCCI (@BCCI) October 25, 2024
रमणदीप सिंग रणजी हंगामात पंजाबकडून खेळतो. पण, आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईटरायडर्सशी करारबद्ध आहे. यंदा आयपीएल विजेत्या कोलकाता संघासाठी त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय ए संघातही त्याला स्थान मिळालं आहे. ५६ प्रथमश्रेणी टी-२० सामन्यांनंतर त्याचा स्ट्राईकरेट तगडा म्हणजे १६८ धावांचा आहे. आणि १६ बळीही त्याने मिळवले आहेत. (Vijaykumar Vyshak)
कर्नाटकचा विजयकुमार व्यक्ष बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून खेळतो. २३ च्या सरासरीने त्याने ३० टी-२० सामन्यांत त्याने ४३ बळी मिळवले आहेत. २७ वर्षीय व्यक्षने भारतीय संघात झालेल्या निवडीसाठी हा स्वप्नवत क्षण असल्याचं म्हटलं आहे. (Vijaykumar Vyshak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community