Vinesh Phogat : विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी विरोधी पथकाची नोटीस, काय आहे कारण?

Vinesh Phogat : नाडाच्या या नेटिशीला विनेशला १४ दिवसांत उत्तर द्यायचं आहे 

50
Vinesh Phogat : विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी विरोधी पथकाची नोटीस, काय आहे कारण?
Vinesh Phogat : विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी विरोधी पथकाची नोटीस, काय आहे कारण?
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी विरोधी संस्था अर्थात, नाडाने कुस्तीपटू विनेश फोगाटला नोटीस पाठवली आहे. ९ सप्टेंबरला नाडाचे पथक तिच्या सोनीपतच्या घरी उत्तेजक चाचणीसाठी गेले असताना ती घरी उपलब्ध नव्हती. ती बाहेर जाणार असल्याचं तिने नियमानुसार, नाडाला कळवलं नव्हतं, असा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी विनेशला ही नोटीस बजावण्यात आली आहे. आणि तिला १४ दिवसांत तिला उत्तर द्यायचं आहे.  (Vinesh Phogat)

(हेही वाचा- ‘मी बंगळुरू फ्रँचाईजीत जाणार हे ऐकूनच आता कंटाळा आलाय,’ – Rishabh Pant)

‘डोपिंग प्रतिबंधक नियमांनुसार खेळाडूने आपला ठावठिकाणा नाडाला कळवणं बंधनकारक आहे. पण, याचं पालन करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. आणि या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुमचा प्रतिसाद मिळविण्यासाठी ही नोटीस जारी केली आहे. तुमची चाचणी घेण्यासाठी त्या दिवशी एक डोप कंट्रोल ऑफिसर (डीसीओ) यांना घटनास्थळी पाठवण्यात आले होते, परंतु तुम्ही कार्यक्रमस्थळी उपस्थित नसल्यामुळे ते तसे करू शकले नाहीत. (Vinesh Phogat)

नाडा ही जागतिक उत्तेजक चाचणीविरोधी संस्था वाडाचा भाग आहे. वाडाच्या नियमानुसार, वर्षभरात कधीही आणि कुठेही खेळाडूची अचानक उत्तेजक चाचणी होऊ शकते. त्यासाठी खेळाडूने वर्षभरात ते कुठे जाणार आहेत, याची माहिती नाडाला वेळोवेळी देणं बंधनकारक आहे. एका वर्षांत ३ दा खेळाडू दिलेल्या ठिकाणी सापडला नाही तर तो गुन्हा मानून खेळाडूवर कारवाई करण्याचे अधिकार राष्ट्रीय संस्थेकडे देण्यात आले आहेत.  (Vinesh Phogat)

(हेही वाचा- Sion Koliwada मध्ये झळकले बॅनर : ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद…राजेश्री राजेश शिरवडकर के साथ’)

विनेशला एकतर उल्लंघन मान्य करावे लागेल किंवा ती त्या ठिकाणी सुमारे ६० मिनिटे उपस्थित असल्याचा पुरावा द्यावा लागेल. किंवा उत्तेजक चाचणी विषयक नियमांचं हे उल्लंघन नाही, असं विनेशला सिद्ध करावं लागेल. (Vinesh Phogat)

विनेश सध्या तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत जुलाना परिसरात प्रचारात व्यग्र आहे. या महिन्यात तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियाने अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक जुलाना विधानसभेतून लढवत आहे. (Vinesh Phogat)

(हेही वाचा- Narendra Modi Meet Olympiad Teams : नरेंद्र मोदींना भारतीय बुद्धिबळपटूंकडून बुद्धिबळाचा पट भेट )

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेशने निवृत्ती जाहीर केली होती. अंतिम फेरी गाठूनही तिला पदक मिळवता आले नाही. कारण १०० ग्रॅम जास्त वजन असल्याने ती अपात्र ठरली होती. त्यानंतर तिने या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील केलं. परंतु ते फेटाळण्यात आले. (Vinesh Phogat)

तिने ५० किलो वजनी गटात सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. (Vinesh Phogat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.