Vinesh Phogat Appeal : विनेश प्रकरणी आता सपोर्ट स्टाफची चौकशी होणार, क्रीडा लवादाकडेही दाद 

Vinesh Phogat Appeal : आपल्याला संयुक्तपणे रौप्य पदक मिळावं अशी मागणी विनेशने क्रीडा लवादाकडे केली आहे

136
Vinesh Phogat : ….म्हणून क्रीडा लवादाने फेटाळलं विनेशचं अपील
Vinesh Phogat : ….म्हणून क्रीडा लवादाने फेटाळलं विनेशचं अपील
  • ऋजुता लुकतुके

विनेश फोगाट (Vinesh Phogat Appeal) ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आणि त्यानंतर नवी दिल्लीतही हालचालींना वेग आला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांच्याशी फोनवर चर्चा करून या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची तयारी त्यांना करायला सांगितली. त्यानुसार, विनेशच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील करण्यात आलं आहे. शिवाय तिच्याबरोबरच्या सपोर्ट स्टाफचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी विनेशचं वजन कमी करण्यासाठी योग्य प्रयत्न केले नाहीत का या दिशेनं चौकशी होणार आहे.

क्रीडा लवादाकडे अर्ज करताना विनेशनं आपल्याला संयुक्तपणे रौप्य मिळावं अशी मागणी केली आहे. तिची दुसरी मागणी सुवर्ण पदकाचा सामना थांबवावा अशी होती. पण, ती फेटाळण्यात आली. दुसरीकडे तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांची चौकशी होणार आहे. (Vinesh Phogat Appeal)

(हेही वाचा- Vinesh Phogat Retires : ‘मी हरले,’ अशी भावनात्मक पोस्ट करत विनेश फोगाटने सोडली कुस्ती )

विनेश अपात्र ठरल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिच्या वाढलेल्या वजनावर, तिच्यावर एवढंच नाहीतर तिच्या सपोर्ट स्टाफवरही. अशातच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला फायनलमधून अपात्र ठरवण्यात आल्याचा निर्णय आला आणि एकच गदारोळ झाला.  WFI अध्यक्षांनी विनेशच्या सपोर्ट स्टाफच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विनेशचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कसं झालं? तिनं काय खाल्लं? नेमकं कसं आणि काय घडलं? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आता विनेशच्या सपोर्ट स्टाफची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Vinesh Phogat Appeal)

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी विनेश फोगाटचं वजन सुमारे ४९.९ किलो होतं, परंतु सहसा तिचं वजन ५७ किलो असतं, त्यामुळे तिला वजन मर्यादेत राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोडंसं खाल्ल्यानं त्याचं वजन किमान ५३ किलोपर्यंत वाढले. (Vinesh Phogat Appeal)

(हेही वाचा- बांगलादेशात अडकलेल्यांच्या मदतीसाठी CM Eknath Shinde यांची परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्याशी चर्चा)

उपांत्य फेरीनंतर तिचं वजन अंदाजे ५२.७ किलो होतं. तिनं कोणताही ब्रेक न घेता, खाणं-पिणं न करता सतत वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. सकाळपर्यंत तिचं वजन ५०.१ वर आणण्यात विनेश फोगटला यश आलं. मात्र, उर्वरित वजन कमी करण्यासाठी तिला अधिकचा वेळ मिळाला नाही. (Vinesh Phogat Appeal)

मंगळवारी रात्री विनेश फोगटचं वजन दोन किलोनं वाढलं होतं. तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांनी विनेश फोगाटचं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय योजले. ती रात्रभर झोपली नाही, खूप कमी पाणी घेत होती, ऑलिम्पिक स्पोर्ट्स व्हिलेजमधील जिममध्ये तासन्तास स्किपिंग, जॉगिंग आणि सायकलिंग करत होती. याशिवाय विनेश फोगटनं तिचे केसही कापलं. रक्त काढलं. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचे कोणतेही उपाय प्रभावी ठरले नाहीत आणि तिचं वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं.  (Vinesh Phogat Appeal)

(हेही वाचा- Crime News : दाट धुक्याने घेतला तरूणाचा जीव; तब्बल १५०० फूट खोल दरीत पडून मृत्यू)

विनेश फोगाटचा सपोर्ट स्टाफ वजनावर लक्ष ठेवण्यासाठी अपयशी का ठरला? असा प्रश्नही सध्या उपस्थित केला जात आहे. तिची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक वोलार अकोस आणि फिजिओ अश्विनी जीवन पाटील यांच्यासह वैयक्तिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तिचं वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेळेअभावी शक्य झालं नाही आणि काहीशा ग्रॅम वजनामुळे विनेश पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) च्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. (Vinesh Phogat Appeal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.