Vinesh Phogat ला रौप्य पदक नाहीच

227

कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी झाली आहे, पण निकाल देण्याची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. मात्र आता या प्रकरणाचा निर्णय आला आहे. सीएएसने विनेशचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे आता तिला रौप्य पदक मिळणार नाही.

(हेही वाचा Independence Day : भारतच नव्हे, १५ ऑगस्ट रोजी ‘हे’ देशही साजरा करतात स्वातंत्र्य दिन)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे  (Vinesh Phogat) १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर केलेल्या अपीलात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा निर्णय १३ ऑगस्टला दिला जाणार होता. मात्र निर्णयाची तारीख १६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता त्यापूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा लवादाने विनेश फोगट (Vinesh Phogat) प्रकरण फेटाळून लावले आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या  (Vinesh Phogat) प्रकरणात युनायटेड वर्ल्ड रेसलिंग विरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टच्या एकमेव लवादाकडे केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अर्ज फेटाळण्याच्या निर्णयावरही पीटी उषा यांनी आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.