Vinesh Phogat : विनेश फोगाटने दिली ‘गुड न्यूज’, आई होणार असल्याची दिली बातमी

विनेश २०१८ साली सोमवीर राठीशी विवाहबद्ध झाली आहे.

41
Vinesh Phogat : विनेश फोगाटने दिली ‘गुड न्यूज’, आई होणार असल्याची दिली बातमी
Vinesh Phogat : विनेश फोगाटने दिली ‘गुड न्यूज’, आई होणार असल्याची दिली बातमी
  • ऋजुता लुकतुके

भारताची स्टार कुस्तीपटू आणि अलीकडेच राजकारणात प्रवेश केलेली विनेश फोगाटने (Vinesh Phogat) वैयक्तिक आयुष्यातील एक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. ‘पती सोमवीर बरोबरच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. मी लवकरच आई होणार आहे,’ असं तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहून आपला आनंद चाहत्यांबरोबर वाटला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) १६० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला (Vinesh Phogat) ऐनवेळी स्पर्धेतून बाद व्हावं लागलं होतं. त्या दु:खद अनुभवानंतर विनेशने (Vinesh Phogat) आंतरराष्ट्रीय कुस्तीला राम राम ठोकला आहे.

पण, अलीकडेच हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ती आमदार म्हणून निवडून आली आहे. त्यातच तिने ही गोड बातमी दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) ५० किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण, अंतिम स्पर्धेच्या दिवशी सकाळी वजन जास्त भरल्यामुळे तिला बाद व्हावं लागलं. आपली बाजू तिने क्रीडा लवादाकडेही मांडली होती. पण, तो निकालही तिच्या विरोधात गेला. पॅरिसमधून ती विमनस्क अवस्थेतच भारतात परतली होती. कुस्ती खेळातील तिचे मित्र बजरंग पुनिया, साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी तिला धीर दिला. आताही तिच्या आनंदाच्या क्षणी त्यांनीच पहिली प्रतिक्रिया विनेशच्या संदेशावर दिली आहे.

(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs NZ Final : भारत, न्यूझीलंड अंतिम सामन्यात कोण असणार मैदानावरील पंच? कोण तिसरे पंच?)

पॅरिसमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर विनेश (Vinesh Phogat) काही काळ निराश झाली होती. त्या आवेशात तिने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्तीही स्वीकारली. पण, तिचं जन्मगाव असलेल्या हरयाणातील जुलाना इथं तिचं जोरदार स्वागत झालं. तिथून पुढे तिने राजकारणात उतरण्याचाही निर्णय घेतला. आणि लगेचच झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत ती जुलाना इथून भाजपाचे उमेदवार योगेश बैरागी (Yogesh Bairagi) यांच्या विरोधात निवडूनही आली. ६,००० पेक्षा जास्त मतांनी तिचा विजय झाला होता.

कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सरण (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील आंदोलनातही विनेश पुढे होती. दीड वर्ष या आंदोलनात तिने नेटाने लढा दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.