Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या अपीलवरील सुनावणी आता १६ ऑगस्टला

132
Vinesh Phogat : विनेश फोगाट राजकारणात उतरणार? बबिता फोगाटशी दोन हात?
Vinesh Phogat : विनेश फोगाट राजकारणात उतरणार? बबिता फोगाटशी दोन हात?
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने विनेश फोगाटच्या (Vinesh Phogat) अपीलवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता ही सुनावणी १६ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनेश आणि भारतीय पाठिराख्यांची प्रतीक्षा वाढली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यात ५० किलो वजनी गटातून विनेशला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं. अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या वजन मापनाच्या वेळी तिचं वजन १०० ग्रॅमनी जास्त भरलं होतं.

(हेही वाचा- Nalasopara Crime : दोन कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरीयन महिलेला अटक )

विनेश फोगाट (Vinesh Phogat) विरुद्ध जागतिक कुस्ती संघटना अशी ही सुनावणी आहे. या दाव्यातील एकमेव आर्बिट्रेटर डॉ ॲनाबेल बेनेट यांनी आपलं निरीक्षण दाखल करण्यासाठी एक दिवसाचा अतिरिक्त वेळ मागितल्यामुळे यावेळी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर आणखी २४ तासांनी क्रीडा लवाद आपला निकाल देईल असा अंदाज आहे.

विनेशने अपील करताना गुझमान लोपेझच्या बरोबरीने आपल्यालाही रौप्य मिळावं अशी विनंती केली आहे. गुझमान लोपेझला विनेशने उपांत्य फेरीत हरवलं होतं. पण, विनेश अपात्र ठरवल्यावर तिला पुढे चाल मिळाली. ती अंतिम फेरीत पोहोचली. आता तिच्याबरोबर पदक विभागून मिळावं अशी विनेशची लवादाकडे मागणी आहे. (Vinesh Phogat)

(हेही वाचा- “पुढची ५ वर्ष भयंकर…” परराष्ट्र मंत्री S Jaishankar यांची भविष्यवाणी)

चार फ्रेंच वकिलांनी लवादासमोर विनेशची बाजू मांडली आहे. आता तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे.

 ऑलिम्पिकमधून अपात्र झाल्यावर २९ वर्षीय विनेशने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस हे तिचं तिसरं ऑलिम्पिक होतं. सध्या विनेश भारतात परतली आहे. आणि क्रीडा लवादाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. विनेशचे काका आणि प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट यांनी लवादाच्या निर्णयाकडे लक्ष असल्याचं म्हटलं आहे. (Vinesh Phogat)

 विनेश ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली असली तरी भारतीय पथकातील ज्येष्ठ खेळाडू आणि इतर खेळांमधूनही तिचा सहानुभूती आणि पाठिंबा मिळाला आहे. ऑलिम्पिक रौप्य विदेता नीरज चोप्रानेही विनेशने केलेली कामगिरी नजरेआड करता येणार नसल्याचं म्हटलं आहे. (Vinesh Phogat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.