Vinesh Phogat Heart Break : विनेश फोगाटचं सुवर्ण हुकलं, वजन वाढल्याने स्पर्धेतून बाद 

Vinesh Phogat Heart Break : पुन्हा एकदा विनेश फोगाटचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं आहे 

136
Vinesh Phogat : विनेश फोगाटवरील निकाल आता १३ ऑगस्टला
  • ऋजुता लुकतुके

भारतीय पथकासाठी बुधवारी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटचं वजन ५० किलोंच्या वर काही ग्रॅम वाढल्यामुळे या वजनी गटातून तिला बाद करण्यात आलं आहे. विनेश आणि पर्यायाने भारताचं पदक त्यामुळे हुकलं आहे. (Vinesh Phogat Heart Break )

विनेश एरवी ५३ किलो वजनी गटात खेळत होती. पण, ऑलिम्पिकपूर्वी तिने ५० किलो गटात खेळण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी वजनही कमी केलं. मंगळवारी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुरेख खेळ करत तिने अंतिम फेरीत बाजी मारली. पण, नेमकी माशी शिंकली. मंगळवारीच तिचं वजन २०० ग्रॅमनी वाढलं होतं. रात्रभर ते कमी करण्याचे सगळे प्रयत्न संघ प्रशासन आणि विनेशने केले. पण, ते व्यर्थ ठरले. स्पर्धेपूर्वीच्या वजन प्रक्रियेत तिचं वजन ५० ग्रॅमनी जास्त भरलं. आणि तिला स्पर्धेतून बाद व्हावं लागलं आहे. (Vinesh Phogat Heart Break )

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : विनेशने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनेत्री कंगना रनौतची सोशल मीडिया पोस्ट का चर्चेत आहे? )

‘भारतीय संघाने अटोकाट प्रयत्न करूनही बुधवारी सकाळी विनेशचं वजन ५० किलोंपेक्षा काही ग्रॅमनी जास्त भरल्यामुळे विनेश बाद झाली आहे. यापुढे भारतीय संघ प्रशासन इतक्यातच यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा मान तुम्ही राखाल, अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे,’ असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून पत्रकारांना लेखी कळवण्यात आलं.  (Vinesh Phogat Heart Break )

यापूर्वीही विनेशला वजनाची समस्या भेडसावली होती. शेवटची पात्रता स्पर्धा बाकी असतानाही विनेश जेमतेम वजनाच्या निकषात बसली होती. आणि तिला पात्रता स्पर्धा कशीबशी खेळता आली. यावेळी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे विनेशवर सगळ्यांचं लक्ष होतं. पण, आता तिला खाली हात पॅरिसहून परतावं लागणार आहे. (Vinesh Phogat Heart Break )

(हेही वाचा- लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी; Aditi Tatkare यांनी केले आवाहन)

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये उपउपान्त्य फेरीत ऐनवेळी झालेल्या दुखापतीमुळे विनेशचं पदक हुकलं. त्यानंतर पुनरागमनासाठीही तिला काही वर्षं द्यावी लागली. आणि त्यातच टोकयो ऑलिम्पिकचं पदकही तिचं अपुऱ्या सरावामुळे गेलं. आता पॅरिसमध्ये हा धक्का तिला पचवावा लगणार आहे. (Vinesh Phogat Heart Break )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.