- ऋजुता लुकतुके
वजनी गटापेक्षा १०० ग्रॅम वजन जास्त भरलं म्हणून विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ५० किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यावर विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. आपल्याला संयुक्तपणे रौप्य मिळावं, अशी तिची मागणी आहे. शनिवारी या प्रकरणी सर्व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर लवादाने आधी रविवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. पण, आता हा निकाल १३ ऑगस्टला येणार असल्याचं समजतंय.
अंतिम स्पर्धेपूर्वी रात्रभर प्रयत्न करूनही विनेशचं वजन ५० किलो आणि १०० ग्रॅम भरलं. रात्री भारतीय पथकाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दिनशॉ पारडीवाला विनेशबरोबर (Vinesh Phogat) बजन कमी करण्यासाठी काम करत होते. त्यांनी सौनामध्ये व्यायामासह तिचे केस कापणं, कपड्याचं वजन कमी करणं, रक्त कमी करणं असे उपायही केले. पण, तरीही विनेशचं वजन कमी झालं नाही आणि तिच्यावर अपात्र ठरण्याची वेळ आली.
(हेही वाचा – #independenceday : देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश ब्रिटिशांनीच काढले?)
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी विनेशला न्याय मिळावा अशी मागणी करत असतानाच वैद्यकीय पथकाने पूर्ण प्रयत्न केल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. असोसिएशन दिनशॉ पारडीवाला यांच्या पाठीशी उभी असल्याचं त्या म्हणाल्या.
‘कुस्ती, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध, ज्युदो अशा वैयक्तिक खेळात जिथे वजनी गट महत्त्वाचा असतो, खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षक दिलेले असतात. त्यांच्याबरोबर खेळाडू काम करतात आणि वजन तसंच सरावाची जबाबदारी खेळाडू आणि या सपोर्ट स्टाफची आहे. ऑलिम्पिक असोसिएशनने खेळाडूंना मदत म्हणून आपलं वैद्यकीय पथक तिथे पाठवलं होतं. त्यांच्यावर वजन कमी करण्याची जबाबदारी नाही,’ असं ऑलिम्पिक असोसिएशनने रविवारी एक पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. दिनशॉ पारडीवाला यांचं काम खेळाडूंना अचानक झालेली दुखापत किंवा दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंना मदत हे होतं, असंही पी टी उषा यांनी स्पष्ट केलं आहे. (Vinesh Phogat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community