-
ऋजुता लुकतुके
५० किलो वजनी गटात १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अंतिम फेरीसाठी अपात्र ठरलेल्या विनेश फोगाटने अखेर जड अंत:करणाने कुस्तीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाटनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आई… कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन.”, असं म्हणत जड अंतःकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा म्हटलंय. (Vinesh Phogat Retires)
(हेही वाचा- बांगलादेशात अडकलेल्यांच्या मदतीसाठी CM Eknath Shinde यांची परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्याशी चर्चा)
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी ५० किलो गटात पात्र ठरली. आणि समोर तीन कठीण कुस्तीपटूंचं आव्हान असताना ती अंतिम फेरीत पोहोचली. पहिल्याच फेरीत तिने माजी ऑलिम्पिक चॅम्पियन सुझी सुसुकीला मात दिली. ती जिद्दीनं लढली. तिनं एकापाठोपाठ एक असे तीन सामने खेळले. अन् मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली. (Vinesh Phogat Retires)
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 7, 2024
विनेश फोगाटनं तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकानं जिंकला होता. प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणंही सोडला नव्हता. त्यावेळी विनेशची देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की, तयारी करा मी सुवर्ण घेऊन येतेय. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, काही ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण रणांगणात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली. (Vinesh Phogat Retires)
(हेही वाचा- Crime News : दाट धुक्याने घेतला तरूणाचा जीव; तब्बल १५०० फूट खोल दरीत पडून मृत्यू)
विनेशच्या या घोषणेनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियानं सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आणि पोस्ट केली. त्यानं लिहिलं की, “विनेश, तू पराभूत झाला नाहीस, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस, तू भारताचा अभिमान आहेस.” (Vinesh Phogat Retires)
विनेश फोगाटला जास्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यानंतर तिनं क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) अपील केलं होतं. या स्पर्धेसाठी तिला रौप्यपदक देण्यात यावं, अशी मागणी विनेश फोगाट केली होती. (Vinesh Phogat Retires)
(हेही वाचा- Ceropegia Shivarayina : विशाळगडावर सापडली नवी वनस्पती; शिवाजी महाराजांचे दिले नाव)
कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आलं. ५० किलो गटात तिचं वजन सुमारे १०० ग्रॅम अधिक असल्याचं आढळून आलं. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्यानं अंतिम सामन्याच्या काही तास आधीच तिला अपात्र ठरवण्यात आलं. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत धमाकेदार विजय मिळवूनही विनेशचं ‘गोल्ड’न स्वप्न भंगलं आणि कोट्यवधी भारतीयांची स्वप्नही भंगली. (Vinesh Phogat Retires)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community