Vinesh Phogat Returns : विनेश फोगाट मंगळवारी भारतात परतणार

दुसरीकडे, विनेशने अपात्रतेविरोधात केलेल्या अपीलवर सुनावणीही मंगळवारीच होणार आहे.

172
Vinesh Phogat Returns : विनेश फोगाट मंगळवारी भारतात परतणार
Vinesh Phogat Returns : विनेश फोगाट मंगळवारी भारतात परतणार
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) संपल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट मंगळवारी नवी दिल्लीत परतणार आहे. कांस्य पदक विजेता अमन सेहरावतही तिच्याबरोबर असणार आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी तिचं विमान लँड होईल. विनेशने या ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. पण, अंतिम फेरीपूर्वी तिचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद व्हावं लागलं. (Vinesh Phogat Returns)

त्यानंतर विनेश आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने क्रीडा लवादाकडे या प्रकरणी दाद मागितली आहे. आणि त्याची सुनावणीही सुरू आहे. मंगळवारी उशिरा या प्रकरणाचा निकालही अपेक्षित आहे. या दरम्यान विनेशने तिची बाजूही लवादासमोर मांडली आहे. ती सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विनेश सोमवारी ऑलिम्पिक नगरीतून भारतासाठी रवानाही झाली आहे. (Vinesh Phogat Returns)

(हेही वाचा – MSBSHSE : अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर)

क्रीडा लवादाकडे दाद मागताना विनेशने आपल्याला संयुक्तपणे रौप्य पदक देण्यात यावं अशी मागणी केली आहे. विनेशने आपली बाजू मांडताना रेपिचाज फेऱीतील कांस्य पदकविजेतीचा दाखला दिला आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकाविरुद्ध हरलेल्या खेळाडूंना रेपिचज फेऱ्या खेळण्याची संधी मिळते. विनेश अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे युकी सुसाकीला तशी संधी मिळाली. पण, विनेशची पात्रता रद्द झाल्यानंतरही युसी रेपिचाज फेऱ्यांमध्ये खेळत राहिली. जर तिला खेळता येतं, तर युनायटेड कुस्ती फेडरेशनच्या नियमांमध्ये घोळ आहे. आणि त्यावर बोट ठेवण्याचा विनेशच्या पथकाचा प्रयत्न आहे. (Vinesh Phogat Returns)

कुस्ती फेडरेशनने विनेशला रौप्य देण्याच्या विरोधात आपली बाजू मांडली आहे. आणि अंतिम निकाल भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा अपेक्षित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.