Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जुन पुरस्कार

कुस्तीपटू विनेश फोगाटने २०२० मध्ये मिळालेला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान खेल रत्न पुरस्कार आणि सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या अर्जुन पुरस्कार परत केला आहे. ब्रिजभूषण आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या वर्चस्वाला विरोध दर्शवत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

234
Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जुन पुरस्कार

कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) शनिवारी (३० डिसेंबर) खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केले. विनेश हे पुरस्कार परत करण्यासाठी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात जात असताना पोलिसांनी तिला अर्ध्या वाटेत रोखले. त्यानंतर तिने कर्तव्य पथावर पुरस्कार जमिनीवर ठेवले आणि हात जोडून परतली.

(हेही वाचा – Kho Kho National Championship : महाराष्ट्राच्या कुमार संघांना दुहेरी मुकुट )

ब्रिजभूषण आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या वर्चस्वाला विरोध –

ब्रिजभूषण यांचे जवळचे सहकारी संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या नवीन कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर त्याच दिवशी साक्षी मलिकने तिचे शूज टेबलावर ठेवले आणि कुस्तीतून निवृत्त झाली. हे सर्व कुस्तीपटू (Vinesh Phogat) भारतीय कुस्ती महासंघावरील ब्रिजभूषण आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या वर्चस्वाला विरोध करत आहेत. दरम्यान सरकारने संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीला निलंबित केले आहे.

(हेही वाचा – Fire : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीमध्ये लागली आग ; ६ कामगारांचा मृत्यू)

कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये –

विनेशने फोगाटने (Vinesh Phogat) ३ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना २ पानांचे पत्र लिहिले होते. ज्यामध्ये महिला कुस्तीपटूंना न्याय मिळत नसल्याचे म्हटले होते. पुरस्कार परत करताना विनेश म्हणाली की, “मी न्यायासाठी येथे आले आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.” बजरंग पुनियाने विनेशच्या पुरस्कार परतीचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहेत.” विनेशच्या (Vinesh Phogat) आधी बजरंग पुनियाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्यांनी देखील हा पुरस्कार पंतप्रधानांच्या घराबाहेरील फूटपाथवर ठेवला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.