Vinesh Phogat : राजकारणातील पहिला डाव विनेशने जिंकला, पी. टी. उषा काय म्हणाल्या?

158
Vinesh Phogat : राजकारणातील पहिला डाव विनेशने जिंकला, पी. टी. उषा काय म्हणाल्या?
Vinesh Phogat : राजकारणातील पहिला डाव विनेशने जिंकला, पी. टी. उषा काय म्हणाल्या?
  • ऋजुता लुकतुके 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत अंतिम फेरीत पोहोचूनही विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पदकापासून दूर रहावं लागलं. वजन ५० किलोंपेक्षा १५० ग्रॅम जास्त भरल्यामुळे ती अपात्र ठरून तिला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. क्रीडा लवादानेही तिच्या विरुद्धच कौल दिला. या सगळ्या अनुभवानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून अचानक निवृत्ती जाहीर केली. हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढण्याचा निर्णयही घेतला. मंगळवारी लागलेल्या निकालात जुमेला मतदारसंघातून ती विधानसभेवर निवडून आली आहे.

ऑलिम्पिक अपात्रता प्रकरणात ती आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी. टी. उषा (P. T. Usha) आमने सामने आल्या होत्या. उषा यांनी आपल्याला लवादाकडे बाजू मांडण्यात मदत केली नाही, असा आरोप विनेश फोगाटने  (Vinesh Phogat) अलीकडेच केला होता. त्यावर पी टी उषा यांनी आता खरमरित उत्तर दिलं आहे. विनेशच्या राजकीय विजयाबद्दल प्रतिक्रिया द्यायचं त्यांनी नाकारलं. पण, विनेशच्या आरोपांचा समाचार घेतला.

(हेही वाचा- Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला)

‘विनेशने ऑलिम्पिक असोसिएशनवर केलेले आरोप चुकीचे आहेत. वजन जास्त भरलं हा दोष पूर्णपणे तिच्या सहाय्यकांचा आहे. त्यात असोसिएशनची काहीच भूमिका नव्हती,’ असं उषा यांनी स्पष्ट केलं. क्रीडापटू म्हणून तिची कारकीर्द आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवात यावर थेट नाही तरी अप्रत्यक्षपणे त्या बोलल्याच. ‘पॅरिसला ती क्रीडापटू म्हणून गेली होती. त्यामुळे तिने खिलाडू वृत्ती दाखवून भाष्य करावं. तिने जी जी मदत ऑलिम्पिक असोसिएशनकडे मागितली ती आम्ही दिली. जागतिक कुस्ती संघटनेकडे तिच्यासाठी दाद मागितली. तिच्यासाठी वकील पुरवले. वजन आटोक्यात ठेवणं हे तिचं आणि तिच्या चमूचं काम होतं,’ असं उषा यांनी या बाबतीत सांगितलं. (Vinesh Phogat)

विनेशने पॅरिस ऑलिम्पिकनंतर राजकारणात प्रवेश करून नवीन इनिंग सुरू केली आहे. (Vinesh Phogat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.