Vinesh Phogat : हरयाणाच्या पदक विजेत्यांचं झालं नाही, असं कौतुक विनेशचं का?

Vinesh Phogat : १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं होतं 

157
Vinesh Phogat : हरयाणाच्या पदक विजेत्यांचं झालं नाही, असं कौतुक विनेशचं का?
Vinesh Phogat : हरयाणाच्या पदक विजेत्यांचं झालं नाही, असं कौतुक विनेशचं का?
  • ऋजुता लुकतुके

५० किलो वजनी गटात ऑलिम्पिक पदक हुकल्यानंतर विनेश फोगाट शनिवारी नवी दिल्लीत आणि रविवारी आपलं मूळ गाव बिलालीला पोहोचली. साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) या तिच्या साथीदारांनी तिची जंगी मिरवणूक दिल्ली इथं काढली होती. पण, भोवती जल्लोष सुरू असताना विनेशचे डोळे मात्र पाणावलेलेच होते. अर्थातच, कारण होतं १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे हुकलेल्या पदकाचं. अलीकडेच तिचं अपीलही क्रीडा लवादाने फेटाळलं. पदक हुकल्यानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय स्तरावर निवृत्तीही जाहीर केली.  (Vinesh Phogat)

(हेही वाचा- Nashik मध्ये दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत; ATS ची कारवाई)

आताही नवी दिल्लीत तिला हार घालण्यात आला आणि तिची मिरवणूक निघाली तेव्हा पीटीआयशी बोलताना तिने एकच भावना व्यक्त केली. ‘ऑलिम्पिक पदक न मिळणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी जखम असेल. ती कधी भरून निघेल ते मला माहीत नाही. मला सावरायला किती वेळ लागेल हे आताच मी सांगू शकणार नाही. पण, आज ज्याप्रकारे माझं स्वागत झालं, ते पाहून मला नवीन ऊर्जा नक्की मिळाली आहे. आता ती ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरेन असं मला वाटतं,’ असं विनेश पीटीआयशी बोलताना म्हणाली.  (Vinesh Phogat)

 विनेशने आतापर्यंतच्या कारकीर्दीत तीन राष्ट्रकूल सुवर्ण, एक आशियाई सुवर्ण आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्य पदक कमावली आहेत. नवी दिल्लीहून तिचं मूळ गाव बिलाली इथं तिची मिरवणूक निघाली तेव्हा वाटेत जवळ जवळ प्रत्येक खाप पंचायतीने तिचं स्वागत केलं. या स्वागतामुळे विनेश भारावली होती. ‘ऑलिम्पिकने मला सुवर्ण पदक दिलं नाही. पण, तुम्ही लोकांनी ते दिलंत. मला आता शंभर सुवर्ण पदकं मिळाली आहेत,’ असं विनेशने यावेळी बोलून दाखवलं.  (Vinesh Phogat)

 नवी दिल्ली ते बिलाली अशी विनेशची १२० किलोमीटरची मिरवणूक काढण्यात आली. आणि याचं आयोजन हरयाणातील खाप पंचायतने केलं होतं. हरयाणाकडून दोन जण ऑलिम्पिक खेळले आणि पदक जिंकले आहेत. पण, त्याचं झालं नाही, इतकं जोरदार स्वागत विनेशचं झालं. याबद्दल सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. तिला सोन्याची गदाही प्रदान करण्यात आली. (Vinesh Phogat)

(हेही वाचा- Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?)

दिवसभराच्या प्रवासानंतर दमलेल्या विनेशने तरीही उगवत्या कुस्तीपटूंसमोर भाषण केलं. आणि यात तिचे विक्रम मोडणारी आणि तिच्यापुढे जाणारी महिला कुस्तीपटू बिलालीतच जन्माला यावी, असं तिने बोलून दाखवलं. आदी निवृत्ती जाहीर केली असली, तरी कारकीर्दीचं पुढे काय करायचं हे आता शांतपणे ठरवू असंही तिने बोलून दाखवलं आहे. (Vinesh Phogat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.