Vinesh Phogat : विनेश फोगाट राजकारणात उतरणार? बबिता फोगाटशी दोन हात?

104
Vinesh Phogat : विनेश फोगाट राजकारणात उतरणार? बबिता फोगाटशी दोन हात?
Vinesh Phogat : विनेश फोगाट राजकारणात उतरणार? बबिता फोगाटशी दोन हात?
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरलेली आणि अंतिम फेरी गाठूनही पदकाला मुकलेली विनेश फोगाट (Vinesh Phogat) आता राजकारणात उतरण्याची दाट शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दावा केला आहे की, कुस्तीपटू विनेश आगामी हरयाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याआधी विनेश फोगाटने सक्रिय राजकारणात येण्यास नकार दिला होता, परंतु ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, काही राजकीय पक्ष तिला निवडणूक लढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

(हेही वाचा- Child Sexual Abuse : मुंबईत बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ; पाच महिन्यात पोक्सोचे ५०९ गुन्हे)

विनेशची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली, कारण १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी विनेशचे राष्ट्रीय राजधानीत आणि सोनीपतमधील बलाली गावात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी तिच्या लोकप्रियतेचा अंदाजही येत होता. पुढील कारकीर्दीविषयी आता निर्णय घेऊ असं ती तेव्हा म्हणाली होती. आता राजकारणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, विनेश कोणत्या पक्षात सामील होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. (Vinesh Phogat)

२०२४ च्या ऑलिम्पिकनंतर विनेशच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता, फोगाट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी एएनआय ला सांगितले की, कदाचित आगामी हरयाणा निवडणुकीत विनेश फोगाट विरुद्ध बबिता फोगाट (Babita Phogat) या बहिणींमध्ये आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) विरुद्ध योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt) असे चित्र दिसू शकते. पण, जर विनेश राजकारणात प्रवेश करणार असेल, तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Vinesh Phogat)

(हेही वाचा- Hindustan Post Exclusive News : G 20 शिखर परिषद; ध्वज खरेदीवर सव्वा तीन कोटींचा खर्च)

विनेश विमानतळाच्या बाहेर येताच, पहाटेची वेळ असूनही मोठ्या संख्येने जमलेल्या तिच्या चाहत्यांनी, कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिचे जोरदार स्वागत केले. जबरदस्त पाठिंबा आणि प्रेम यामुळे ती भावूक झाली. गेल्या वर्षी कुस्तीतून निवृत्त झालेली साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि बजरंग पुनिया यांनी विनेशचे स्वागत केले. आता कुस्तीचा आखाडा सोडून राजकारणात शड्डू ठोकण्याचा ती विचार करत आहे. (Vinesh Phogat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.