Vinod Kambli Discharged : विनोद कांबळीची रुग्णालयातून सुटी, तरुणांना दिला मद्यपानापासून लांब राहण्याचा सल्ला 

Vinod Kambli Discharged : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विनोद कांबळी रुग्णालयातून घरी परतला आहे 

115
Vinod Kambli Discharged : विनोद कांबळीची रुग्णालयातून सुटी, तरुणांना दिला मद्यपानापासून लांब राहण्याचा सल्ला 
Vinod Kambli Discharged : विनोद कांबळीची रुग्णालयातून सुटी, तरुणांना दिला मद्यपानापासून लांब राहण्याचा सल्ला 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नवीन वर्षी रुग्णालयातून घरी परतला आहे. भारतीय संघाच्या नवीन एकदिवसीय जर्सीतील विनोद भिंवडीतील आकृती रुग्णालयातून बाहेर पडला तेव्हा चाहते आणि मीडियाने गर्दी केली होती. प्रकृतीच्या अनेक तक्रारींनंतर २१ डिसेंबरला विनोदला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. निळी जर्सी घालून विनोद बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात क्रिकेटची बॅटही होती. आणि त्याने उपस्थितांना ती चालवूनही दाखवली. (Vinod Kambli Discharged)

(हेही वाचा- फटाक्यांमुळे मधमाशांचा भाविकांवर हल्ला; Ekvira Devi Temple मध्ये बंदी असूनही वाजवले फटाके)

आकृती रुग्णालयाचे संचालक डॉ शैलेश ठाकूर यांनी विनोदला आपल्या गाडीत बसवून वांद्रे इथं त्याच्या घरी सोडलं. ‘विनोद आता बरा आहे. आणि त्याला मी त्याच्या घरी सोडणार आहे,’ असं ठाकूर यांनी उपस्थित मीडियाला सांगितलं. तर विनोदनेही रुग्णालयातून निघताना एक पत्रकार परिषद घेतली. (Vinod Kambli Discharged)

 ‘या डॉक्टरांनी मला बरं केलं आहे. मी स्वत:लाच वचन दिलं होतं की, बरा होईन तेव्हाच घरी जाईन. आता मी बरा झालो आहे. आणि शिवाजी पार्कला परत जाणार आहे. मी विनोद कांबळी आहे. आणि माझ्यातील क्रिकेट अजून संपलेलं नाही, हे मला लोकांना दाखवून द्यायचं आहे. मी फक्त चौकार आणि षटकारच मारतो, असं विनोद विनोदाने म्हणाला.  (Vinod Kambli Discharged)

(हेही वाचा- Sydney Test : सिडनी कसोटीत कशी असेल खेळपट्टी, कसं आहे हवामान?)

जाता जाता तो एक महत्त्वाचं वाक्य बोलला, ‘नवीन वर्षाच़्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी मद्यापासून दूर राहा. चांगलं आयुष्य जगा,’ असं तो म्हणाला. (Vinod Kambli Discharged)

१९९९ ते २०१० या कालावधीत विनोद कांबळी भारतासाठी ११९ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. १७ कसोटींत त्याने १,०८४ धावा केल्या आहेत. लागोपाठ दोन द्विशतकं करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. १०४ एकदिवसीय सामन्यांत विनोदने २,४७७ धावा केल्या आहेत. (Vinod Kambli Discharged)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.