Vinod Kambli : विनोद कांबळीने स्वत: दिला आपल्या तब्येतीचा महत्त्वाचा अपडेट

काही दिवसांपूर्वी कांबळीचा धड चालताही येत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

169
Vinod Kambli : विनोद कांबळीने स्वत: दिला आपल्या तब्येतीचा महत्त्वाचा अपडेट
Vinod Kambli : विनोद कांबळीने स्वत: दिला आपल्या तब्येतीचा महत्त्वाचा अपडेट
  • ऋजुता लुकतुके

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा (Vinod Kambli) एक व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाला होता. यात कांबळीला चालतानाही लोकांचा आधार ध्यावा लागत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर विनोद कांबळीच्या (Vinod Kambli) तब्येतीला नेमकं काय झालंय अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता त्यावर खुद्ध विनोद कांबळीने (Vinod Kambli) उत्तर दिलं आहे. त्याचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि यात तो आपल्या शाळेतील दोन जुन्या मित्रांबरोबर दिसत आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पंच मार्कस कुटो आणि रिकी कुटो विनोदबरोबर थट्टा मस्करी करताना दिसतात.

‘मी चांगला आहे. देवाची कृपा आहे की, मी तब्येतीने ठणठणीत आहे,’ असं म्हणत कांबळी कॅमेरासमोर थंब्स अप करतो. पुढे तो म्हणतो, ‘तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो. आणि पूर्वी जसा फिरकीपटूंना सीमापार फटकावायचो तसं मी आताही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) करू शकतो.’

(हेही वाचा – OBC Caste Certificate : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत)

या नवीन व्हिडिओमुळे विनोद कांबळीच्या जुन्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला असणार. कारण, यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत विनोद कांबळीला (Vinod Kambli) धड चालताही येत नव्हतं. आणि त्याला चालताना किमान चार लोकांचा आधार घ्यावा लागत होता. या व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळीची तब्येत आणि तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : मुशीर खानच्या शतकाखेरिज पहिला दिवस गोलंदाजांचाच)

विनोद कांबळीच्या (Vinod Kambli) त्या व्हिडिओमुळे सगळ्यांनाच काळजी वाटली होती. तर काहींनी विनोदचा जुना आणि बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मदतीची विनंती केली होती. विनोद कांबळी १९९० च्या दशकातील एक महत्त्वाचा डावखुरा फलंदाज होता. १९९३ मध्ये इंग्लिश संघाविरुद्ध मायेदशातील मालिकेत विनोदने दोन द्विशतकं केली होती. पण, तंदुरुस्ती आणि कामगिरीत सातत्याचा अभाव यामुळे त्याची कारकीर्द अल्पजीवी ठरली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.