- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी लंडनमध्ये आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत केलं आहे. १५ फेब्रुवारी रोजी दोघांना मुलगा झाला आहे. आणि त्याचं नाव दोघांनी अकाय असं ठेवलंय. विराट आणि अनुष्काचं लग्न डिसेंबर २०१७ मध्ये झालं होतं. आणि त्यांची पहिली मुलगी वामिकाचा जन्म २ वर्षांपूर्वी झाला होता. (Virat & Anushka Welcome Baby Boy)
‘ही बातमी देताना आमचं ह्रदय आनंदाने भरून आलं आहे. आणि मनही भरून आलं आहे. १५ फेब्रुवारीला आमच्या घरी वामिकाचा भाऊ अकाय हा नवीन पाहुणा आला आहे. आणि हे सगळ्यांना कळवताना आम्हाला खूप आनंद होतोय.’ (Virat & Anushka Welcome Baby Boy)
पुढे विराट (Virat Kohli) म्हणतो, ‘या आनंदाच्या क्षणी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत. आणि आमचं खाजगी आयुष्य खाजगीच राहावं अशी आमची इच्छा आहे. त्याचा मान तुम्ही नक्कीच राखाल याची खात्री आहे. कृतज्ञतापूर्वक तुमचे विराट आणि अनुष्का.’ (Virat & Anushka Welcome Baby Boy)
View this post on Instagram
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : आमच्या पुढे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही – जरांगे पाटलांचा इशारा)
मालिकेतही भारतीय संघ २-१ असा आघाडीवर
विराटने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. आणि या काळात तो लंडनला पत्नीबरोबर होता. विराटच्या अनुपस्थितीवरून क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मध्यंतरी विराटचा बंगळुरू संघातील सहकारी एबी डिव्हिलिअर्सने दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी सुटी घेतल्याचं म्हटलं होतं. पण, नंतर आपल्या विधानावरून त्याने यु-टर्नही घेतला होता. (Virat & Anushka Welcome Baby Boy)
आता सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विराटच्या अनुपस्थितीत रजत पाटिदार आणि सर्फराझ खान यांना भारतीय संघात संधी मिळाली होती. आणि मालिकेतही भारतीय संघ २-१ असा आघाडीवर आहे. (Virat & Anushka Welcome Baby Boy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community