-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध विक्रमी शतक ठोकलं तेव्हा स्टेडिअममध्ये दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर हजर होता. भारतीय डाव संपल्यावर लगेच सचिनने विराटसाठी एक मोठा संदेश लिहिला आहे. (Virat Kohli 50th Century)
सचिन तेंडुलकरने आपलं शंभरावं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं तेव्हा पत्रकारांनी एका सत्कार समारंभात त्याला प्रश्न विचारला होता. ‘तुझा शतकांचा विक्रम पुढे कोण मोडेल, असं तुला वाटतं?’ सचिनने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं होतं, ‘असे दोन खेळाडू इथं याच खोलीत हजर आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली!’ (Virat Kohli 50th Century)
विराट तेव्हा आपला पहिला विश्वचषक नुकताच खेळला होता आणि जेमतेम १८ वर्षांचा होता. मास्टरब्लास्टरला त्याचा वारसा कोण चालवणार याची कल्पना होती. बुधवारी १५ नोव्हेंबरला सचिनचं म्हणणं निम्मं तरी खरं ठरलं आहे. सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतकांचा विक्रम मोडीत निघालाय आणि तो मोडलाय सचिन ज्याला आपला वारसदार मानत होता त्या विराट कोहलीने. २७९ व्या डावात विराटने आपलं ५० वं शतक पूर्ण केलं. ११३ चेंडूंत ११७ धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकार ठोकले. (Virat Kohli 50th Century)
या शतकाबरोबरच विराटने भारतीय संघाला उपांत्य सामन्यात ४ बाद ३९७ अशी धावसंख्या गाठून देण्यात मदत केली. आणि स्वत: फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले. आणि हे पाहायला सचिन तेंडुलकर स्वत: वानखेडे स्टेडिअमवर हजर होता. विराटनेही मग या विक्रमी शतकानंतर सचिनला पुढे झुकून मानवंदना दिली आणि सचिननेही भारतीय डाव संपल्यावर विराटला एक मोठा कौतुकपर संदेश लिहिला आहे. (Virat Kohli 50th Century)
‘मी पाहिलेला एक छोटा मुलगा विराट झालाय,’ असं सचिन या संदेशात म्हणतो. (Virat Kohli 50th Century)
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023
‘मी पहिल्यांदा तुला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा बरोबरच्या खेळाडूंनी तुझी चेष्टा करण्यासाठी तुला माझ्या पाया पडायला लावलं. तेव्हा मला खूप हसू आलं होतं. पण, हळू हळू तुझ्या खेळीने तू माझ्या पायाशी नाही तर ह्रदयात जागा मिळवलीस. तुझं कौशल्य आणि खेळावरील प्रेम यामुळे माझ्यासमोर मोठा झालेला तू आता विराट खेळाडू बनला आहेस,’ असं सचिनने या संदेशात म्हटलं आहे. (Virat Kohli 50th Century)
(हेही वाचा – Jammu-Kashmir Accident : जम्मू-काश्मीर अपघातातील मृतांना मदत जाहीर, पंतप्रधानांनी ‘X’ द्वारे व्यक्त केल्या भावना)
शिवाय आपला विक्रम एका भारतीयानेच मोडावा याचा आनंद असल्याचंही सचिन संदेशात म्हणतो. उपांत्य सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात विराटने शतक ठोकावं याचाही अभिमान सचिनने व्यक्त केला आहे. (Virat Kohli 50th Century)
विराट या विश्वचषकात चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत १० सामन्यांत त्याने ७११ धावा केल्या आहेत. ५ नोव्हेंबरला कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करणारं ४९ वं शतक ठोकलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्याने ५० वं शतक ठोकलं आहे. (Virat Kohli 50th Century)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community