ऋजुता लुकतुके
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवरील वातावरण काही काळ विराटमय झालं होतं. उपान्त्य सामना विसरून क्षणभर अख्खं क्रिकेट विश्व विराट कोहलीच्या ५० व्या शतकाचा (Virat Kohli 50th Century) आनंद साजरा करत होतं. विराटने मूळात शतक केलं तेच साक्षात सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्यासमोरच. सुनील गावसकर समालोचन कक्षात हजर होते.
तिथे बोलताना ते म्हणाले, ‘सचिनने भारतीय क्रिकेटचा मापदंड उंचावला आहे. विराट तर सुपरह्युमन आहे. त्याने हे मापदंड कुठल्या कुठे नेले आहेत.’ सुनील यांच्याच भावना इतर माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या आहेत. विराटने आपलं पन्नासावं शतक बुधवारी साजरं केलं ते १०५ चेंडूंमध्ये. त्याने ११३ चेंडूंमध्ये एकूण ११७ धावा केल्या त्या २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने.
त्याचा विक्रम पूर्ण झाल्यावर टेनिसमधील गोट म्हणजे ग्रेट ऑफ ऑल टाईम्स असलेल्या नोवाक जॉकोविचने सर्वप्रथम विराटचं अभिनंदन केलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवर जॉकोविच लिहिलो, ‘विराटचं अभिनंदन. ही खूप मोठी कामगिरी आहे!’
Congratulations @imVkohli 🎊 Legendary https://t.co/3TgMXkbWcx
— Novak Djokovic (@DjokerNole) November 15, 2023
विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले आहेत. सध्या तो सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे या स्पर्धेतील. तर भारतातर्फे एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावावर आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबतीत तो आता रिकी पाँटिंगच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सुनील गावसकर यांनीही विराटच्या सातत्याचं कौतुक केलं आहे. ‘विराट ज्या पद्धतीने धावा करतोय ते विलक्षण आहे. सात दिवसांपूर्वी त्याने ४९ वं शतक केलं होतं. (Virat Kohli 50th Century) मध्ये खेळलेले दोन डावही अर्धशतकी आहेत. आणि आता लगेचच ५० वं शतक केलं आहे. हे विलक्षण आहे,’ असं गावसकर स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना म्हणाले.
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023
Sir one word for this selfless Batting 💪💪#INDvsNZ pic.twitter.com/5Sd1yWmf4Y
— KrishnaThakur (@krishnapratap87) November 15, 2023
What a sense of occasion, what a knock! Another special hundred from a man who has made a habit of it at the World Cup. Virat Kohli is now in a league of one, going past the great Sachin Tendulkar’s record of 49 ODI tons. To do it in the World Cup semis is extra special. Take a… pic.twitter.com/y2MAlfdC6J
— VVS Laxman (@VVSLaxman281) November 15, 2023
Virat Kohli. GOAT. 🙇♂️ #50 #INDvNZ #CWC23
— Aakash Chopra (@cricketaakash) November 15, 2023
Join Our WhatsApp CommunityVirat Kohli Indian cricket Ka control room. Yaha se Jeet cotnrol hoti hai ab to sabse zyada shatak Ka control bhi @imVkohli ke naam. 🐐 pic.twitter.com/7uDvdrr9bX
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 15, 2023