विराटचे ७५ वे शतक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कसोटी…

विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ७५ वे शतक केले. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे २८ वे शतक असून तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराटने टेस्ट मॅचमध्ये शतक ठोकले आहे.

( हेही वाचा : राज्यसभेत कॉंग्रेसकडून गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे, तर रजनी पाटील यांच्याकडे व्हीपची जबाबदारी )

विराटचे शतक 

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराटने कसोटी क्रिकेटमध्ये हे शतक केल्याने त्याचे फॅन्स आणि क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. विराटच्या कारकिर्दीतील हे ७५ वे शतक असून त्याचे हे २८ वे कसोटी शतक आहे. सध्या विराट कोहली ट्विटरवर सुद्धा ट्रेंड होत आहे. अनेकांनी त्याला टॅग करत किंग इज बॅक अशा शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान याचा संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ BCCI ने ट्वीट केला असून याला काही सेकंदातच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कसोटी मालिका भारताला जिंकणे आवश्यक आहे. ही मालिका जिंकल्यास भारत WTC च्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार आहे. चौथ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दिलेले आव्हान पूर्ण करण्यापासून टीम इंडिया आणखी ८० धावा मागे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here