विराटने दिला चाहत्यांना अजून एक धक्का… ‘हे’ कर्णधारपदही सोडणार

137

टी-20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा विराट कोहलीने केली आहे. आयपीएल 2021 नंतर हे पद सोडण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.

काय म्हणाला विराट?

आयपीएल 2021चा दुसरा हंगाम सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विराटने मोठी घोषणा केली आहे. बँगलोर संघाचा कर्णधार म्हणून मी हे शेवटचे आयपीएल पर्व खेळत आहे. संघातील खेळाडूंशी आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा करुन आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. गेल्या काही काळापासून मी याचा विचार करत होतो, अलीकडेच मी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले आहे. माझ्यावरील जबाबदारीचा भार कमी करुन, माझ्या खेळाला आणि मला जास्तीत-जास्त वेळ देता यावा म्हणून मी हा निर्णय घेतला आहे, असे विराटने सांगितले.

(हेही वाचाः भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘या’ दिग्गजांची नावे चर्चेत)

हा शेवट नाही

माझ्या आयुष्यातील शेवटचा आयपीएल सामना खेळेपर्यंत मी आरसीबी संघाकडूनच खेळणार आहे, असेही विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. बँगलोरचा कर्णधार म्हणून गेल्या 9 वर्षांच्या या प्रवासात आनंद, दुःख, निराशा या सर्व गोष्टी अनुभवल्या. पण या प्रवासात माझ्या पाठीशी कायम उभे असणा-या सर्व चाहत्यांचा मी खूप आभारी आहे. मला दिलेला हा पाठिंबा मी कधीही विसरू शकत नाही. हा फक्त एक अल्पविराम आहे, प्रवासाचा शेवट नाही, अशा शब्दांत विराटने आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.