-
ऋजुता लुकतुके
डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने बाजी मारली. फ्रँचाईजीने मिळवलेलं हे पहिलं विजेतेपद होतं. आणि ते मिळवताना अंतिम सामन्यात श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) या मराठमोळ्या मुलीने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. मंगळवारी महिला संघाचं घरच्या मैदानावर चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. पुरुषांच्या संघाने यावेळी महिला संघाला अनोखी मानवंदना दिली.
या अनुभवामुळे श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) भारावून गेली होती. सत्कार सोहळ्यानंतर श्रेयांकाने विराटबरोबरचा तिचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. आणि यात विराटला तिचं नाव ठाऊक होतं, याचं आश्चर्य आणि कौतुक तिने व्यक्त केलं आहे.
‘हाय श्रेयांका! तू खूप छान गोलंदाजी केलीस,’ असं विराट मला म्हणाला. त्याला माझं नाव ठाऊक होतं, असं श्रेयांकाने संदेशात लिहिलं आहे.
(हेही वाचा – Rohit Hardik Hug : रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज, सरावाच्या वेळी दोघांनी दिलं आलिंगन)
Started watching cricket cos of him. Grew up dreaming to be like him. And last night, had the moment of my life. Virat said,
“Hi Shreyanka, well bowled.”
He actually knows my name 😬😬😬#StillAFanGirl #rolemodel pic.twitter.com/z3DB0C8Pt0— Shreyanka Patil (@shreyanka_patil) March 20, 2024
विराटमुळे (Virat Kohli) ती क्रिकेटकडे वळली. आणि त्याच्याकडूनच अभिनंदनाचा योग आल्यावर काय बोलावं ते सुचलं नाही, असंही श्रेयांकाने म्हटलं आहे. श्रेयांका बंगळुरू संघातील ऑफ-स्पिनर आहे. आणि अंतिम सामन्याबरोबरच अख्ख्या हंगामात तिने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हंगामात तिने १३ बळी मिळवून परपल कॅपही पटकावली. (Virat Kohli)
अंतिम सामना सुरू होताना दिल्लीची मेरिझान काप गोलंदाजीत सर्वाधिक बळी मिळवून अव्वल होती. पण, अंतिम सामन्यात श्रेयांकाने १२ धावा देत ४ बळी टिपले. आणि कापलाही मागे टाकलं. २१ वर्षीय श्रेयांका बंगळुरूची स्थानिक खेळाडू आहे. आणि यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने स्पर्धेतील उगवती खेळाडू होण्याचा मानही पटकावला. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community