कोहलीची ‘विराट’ कामगिरी; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर

93

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोशल मिडियावर मोठी कामगिरी केली आहे. फेसबुकवर ५० दशलक्ष फॉलोवर्स असलेला तो भारतातील आणि जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहली २०१९ पासून ऑफ फॉर्ममध्ये होता, त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा होत्या. बडे क्रिकेटपटूही त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देत होते.

( हेही वाचा : मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपुलाचा उल्लेख असणाऱ्या शिळा जतन करणार! पहा फोटो )

कोहलीची ‘विराट’ कामगिरी

परंतु अखेर विराटने आशिया कपमध्ये पहिले टी-२० शतक झळकावले आणि विश्वचषकातही त्याने चांगली खेळी केली. विराट कोहलीनेही बुधवारी फेसबुकवर ५० मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले. विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, तो वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तसेच विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर २२५ मिलियन फॉलोअर्स आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. विराटने १३८.१५ च्या स्ट्राईक रेटने ४००० धावा केल्या आहेत.

दरम्यान, टी२० विश्वचषकात पराभव झाल्यावर BCCI ने नव्याने संघ बांधणीला सुरूवात केली आहे. २०२३ मध्ये होणारा विश्वचषक भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणते खेळाडू असणे आवश्यक आहे. टीम इंडियामधील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासाठी हा वर्ल्डकप खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्यासाठी आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.