आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा Virat Kohli ठरला एकमेव फलंदाज

68
आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा Virat Kohli ठरला एकमेव फलंदाज

आयपीएल २०२५ चा शनिवारी (दि. २२) झालेल्या सलामीच्या सामन्यात आरसीबी वि. केकेआर या दोन्ही संघांमध्ये एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यावेळी आरसीबीने केकेआरवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने १६.२ षटकांत ३ विकेट्स गमावत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. यादरम्यान विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएल इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो आजवर कोणत्याच खेळाडूला जमलेला नाही.

(हेही वाचा – ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीवर शिक्कामोर्तब; MNS कडून मुंबई शहराध्यक्ष पदाची घोषणा)

आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत १७५ धावा केल्या. या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली (Virat Kohli) आणि फिल सॉल्ट यांनी धुव्वादार सुरूवात करून दिली. यादरम्यान विराट कोहलीने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. विराट कोहलीने ३१ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकारांसह अर्धशतकी खेळी पूर्ण केली. विराट कोहलीने (Virat Kohli) केकेआरविरूद्ध सामन्यात ३८ धावा करत आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध १००० धावा पूर्ण केल्या. यासह विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात चौथ्या संघाविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

(हेही वाचा – Online Gaming वर केंद्र सरकारचे निर्बंध ; 2,400 बँक खाती, 357 वेबसाइट केल्या ब्लॉक)

विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांविरूद्ध ही कामगिरी केली आहे. विराटशिवाय वॉर्नर आणि रोहित शर्मा यांनी २-२ संघांविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०५७ धावा केल्या आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १०५३ धावा आणि पंजाब किंग्जविरुद्ध १०३० धावा केल्या आहेत. आता विराटच्या (Virat Kohli) या यादीत केकेआरचा संघही सामील झाला आहे. चेस मास्टर विराट कोहलीने या विक्रमासह संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.