ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा भाऊ विकास कोहलीने त्यांच्या आईबद्दल पसरलेल्या सगळ्या अफवांचं खंडन केलं आहे. तसंच आई सरोज कोहली यांची तब्येत तंदुरुस्त असल्याचं स्पष्ट केलं आहे. विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटीतून (Ind vs Eng Test) माघार घेतली होती. आणि तेव्हा त्याने ‘घरगुती कारणामुळे’ असं बीसीसीआयला (BCCI) कळवलं होतं. घरगुती कारण म्हणजे नेमकं काय यावरून अलीकडे काही अफवा मीडिया आणि प्रेक्षकांमध्येही पसरल्या होत्या.
(हेही वाचा – Budget 2024 : जाणून घ्या अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट किती वेळात पूर्ण केलं ?)
यातील एक होतं विराटच्या आईची बिघडलेली तब्येत. या अफवेचं खंडन त्याचा भाऊ विकासने एका पोस्टद्वारे केलं आहे. तर बीसीसीआयनेही अलीकडे चाहत्यांना आवाहन करताना, ‘विराटच्या माघारीवर गरजेपेक्षा जास्त चर्चा करू नका,’ असं म्हटलं होतं.
विकासने बुधवारी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करताना म्हटलंय की, ‘आमच्या आईची तब्येत ठणठणीत आहे. तिला काहीही झालेलं नाही. लोकांनी कुठलीही बातमी पसरवण्यापूर्वी ती नक्की खरी आहे ना याची शाहनिशा करावी. खोटी आणि निराधार माहिती पसरवू नये.’
View this post on Instagram
आईच्या तब्येतीसाठी विराटने मालिकेतून माघार घेतल्याचं बोललं जात होतं. तर काहींनी विराटची पत्नी अनुष्का (Anushka Sharma) पुन्हा एकदा गरोदर असल्याची बातमीही चर्चिली जात होती. बीसीसीआयने विराटऐवजी बदली खेळाडू देताना जे पत्रक काढलं, त्यात कुठलीही उलटसुलट चर्चा या विषयावर न करण्याचं आवाहन बीसीसीआयने आपल्या पत्रकात केलं होतं.
पहिल्या हैद्राबाद कसोटीत (IND vs ENG) विराट खेळला नाही. आणि भारताला २८ धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. इंग्लंडने आपल्या बॅझ-बॉल रणनीतीने भारतीय फिरकीपटूंनाही गोंधळात टाकलं. या आक्रमक रणनीतीला विराट-नीती उत्तर देऊ शकेल, अशी या मालिकेआधी चर्चा होती. पण, नेमका पहिल्या दोन कसोटींत विराट नाहीए. तो थेट राजकोटमध्ये भारतीय संघात दाखल होईल. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community