Virat Kohli : विराट कोहलीच्या १३,००० टी-२० धावा पूर्ण, ही कामगिरी करणारा पहिला भारतीय

मुंबईविरुद्ध विराटने ४२ चेंडूंत ६४ धावा केल्या.

57
Virat Kohli : विराट कोहलीच्या १३,००० टी-२० धावा पूर्ण, ही कामगिरी करणारा पहिला भारतीय
Virat Kohli : विराट कोहलीच्या १३,००० टी-२० धावा पूर्ण, ही कामगिरी करणारा पहिला भारतीय
  • ऋजुता लुकतुके

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आयपीएल (IPL) सामन्यादरम्यान आणखी एक विक्रम लागला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) विराटने ४२ चेंडूंत ६४ धावा केल्या. या दरम्यान त्याने टी-२० प्रकारात १३,००० धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. विराटने या हंगामात आपलं दुसरं अर्धशतकही झळकावलं. विराटचा (Virat Kohli) हा ४०२ वा टी-२० सामना होता. यात त्याचा फलंदाजीचा रेकॉर्ड लक्षवेधी आहे. त्याने ९ शतकं आणि ९९ अर्धशतकांसह १३,०५० धावा केल्या आहेत.

(हेही वाचा – रेल्वेचे पलंग आणि खुर्च्या चोरल्या; Railway Officer वर ११ वर्षांनंतर नोंदवणार गुन्हा)

मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) त्याने ४२ चेंडूंत ६७ धावा करताना २ षटकार आणि ९ चौकार ठोकले. टी-२० प्रकारात १३,००० धावा करणारा विराट (Virat Kohli) हा एकमेव भारतीय आहे. पण, जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज आहे. यापूर्वी ख्रिस गेल, ॲलेक्स हेल्स, शोएब मलिक (Shoaib Malik) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी ही कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधू निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्या जिंकल्या त्याने आपल्या निवृत्तीची धोषणा केली. या प्रकारात भारतीय संघातून खेळताना त्याने १२५ सामन्यांतून ४,१८८ धावा केल्या आहेत. आणि त्याची सरासरी ४८.६९ अशी आहे. तर त्याचा स्ट्राईकरेट १३७ धावांचा आहे.

भारतीय फलंदाजांमध्ये विराटच्या (Virat Kohli) खालोखाल धावा करणारा फलंदाज आहे तो रोहित शर्मा. (Rohit Sharma) त्याने ४५२ सामन्यांमध्ये ११,८६८ धावा केल्या आहेत. तो विराटपेक्षा हजारपेक्षा जास्त धावांनी मागे आहे.

(हेही वाचा – BMC : पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला पोहोचणाऱ्या पुलाच्या बांधकामाला ब्रेक?)

टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणारे पहिले ५ फलंदाज पाहूया,
  • ख्रिस गेल – १४,५६२ (३८१ सामने)
  • ॲलेक्स हेल्स – १३,६१० (४७४ सामने)
  • शोएब मलिक – १३,५५७ (४८७ सामने)
  • कायरन पोलार्ड – १३,५३७ (५९४ सामने)
  • विराट कोहली – १३,०५० (३८६ सामने)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.