-
ऋजुता लुकतुके
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सगळ्यांनाच चिंता आहे ती विराट कोहलीच्या ढासळलेल्या कसोटी फॉर्मची. न्यूझीलंड आणि पाठोपाठ ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे आता ६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध इंग्लंड हा मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना नागपूरला खेळवला जाईल, तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष विराटवर असेल. कसोटी नाही तरी एकदिवसीय क्रिकेट या त्याची दादागिरी असलेल्या प्रकारात विराट कसा खेळतो याची उत्सुकता सर्वांना असेल. (Virat Kohli)
(हेही वाचा- मध्य रेल्वेचा शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी Mega block; असे असेल लोकल रेल्वेचे पुढील नियोजन)
२०२३ चा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक विराटने आपल्या बॅटने गाजवला होता. ३ शतकांसह ७६५ धावा त्याने ठोकल्या. इतकंच नाही तर सचिन तेंडुलकरचा ५० एकदिवसीय शतकांचा विक्रमही विराटने त्या स्पर्धेत मोडला. आता विराटच्या लाडक्या प्रकारात त्याचा हरवलेला सूरही त्याला परत मिळावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. नेमक्या याच भावना युटयूबवरील एका कार्यक्रमात भारताचे माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी बोलून दाखवली आहे. (Virat Kohli)
‘एकदिवसीय क्रिकेट हा विराटचा लाडका फॉरमॅट आहे. आणि तिथे फलंदाजी कशी करायची याचा वस्तुपाठ विराटनेच अनेकांसाठी घालून दिला आहे. त्यामुळे त्याला एकदिवसीय मालिका कठीण जाणार नाही. उलट तो फॉर्ममध्ये परतेल. सुरुवातीला ३०-४० चेंडू खेळून काढल्यानंतर विराटला बाद करणं जवळ जवळ अशक्य असतं. इतक्या वर्षांत फलंदाजीची त्याची शैली ठरून गेली आहे. आणि तिने त्याला घवघवीत यश दिलं आहे. तोच सिलसिला कायम राहावा अशीच अपेक्षा आहे,’ असं बांगरने स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना सांगितलं. (Virat Kohli)
(हेही वाचा- प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर)
थोडक्यात, विराट शैलीत काही बदल करेल किंवा त्याची गरज आहे, असं बांगर यांना वाटत नाही. तर संजय मांजरेकर यांनीही तेच बोलून दाखवलं आहे. ‘फलंदाज फॉर्ममध्ये नसेल तर त्याच्यासाठी एकदिवसीय क्रिकेट हा आदर्श फॉरमॅट आहे. कसोटीच्या मानाने इथं तुमचा कस कमी लागतो. शिवाय टी-२० सारखं आल्या आल्या तुमचे फटके खेळायला लागत नाहीत. तुम्हाला जम बसवायला वेळ मिळतो. विराटची शैलीही तशीच आहे. त्यामुळे त्याच्या खेळासाठी एकदिवसीय क्रिकेट अगदी योग्य आहे. तो इंग्लंड विरुद्घ चांगला खेळ करू शकेल,’ असं मांजरेकरने बोलून दाखवलं. (Virat Kohli)
भारतीय संघ सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिका खेळेल. त्यानंतर ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. आणि लगेचच भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड ११ जानेवारीला होईल. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community